समीर वानखेडेचं मराठी अभिनेत्रीशी लग्न मग पहिल्या लग्नाचा फोटो का फिरतोय?
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वानखेडेंचा फोटो ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. "पैचान कौन?" इतकंच लिहित वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील एकट्याचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला आहे.
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पहिल्या लग्नाचा कथित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्याशी विवाहबंधनात अडकण्याआधी समीर वानखेडे यांचा डॉ शबाना कुरेशी (Shabana Qureshi) यांच्याशी विवाह झाल्याचा दावा केला जात आहे. या पहिल्या लग्न सोहळ्यातील फोटो समोर आले आहेत, मात्र या फोटोच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वानखेडेंचा फोटो ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. “पैचान कौन?” इतकंच लिहित वानखेडेंच्या कथित पहिल्या लग्नातील एकट्याचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला आहे.
Pehchan kaon? pic.twitter.com/S3BOL4Luc8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
त्यानंतर “Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा” असं ट्वीट करत काही कागदपत्रंही त्यांनी शेअर केली आहेत. मलिक यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेचा एक कागद पोस्ट केला आहे. तो कागद नेमका कशा संबंधातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही. मात्र, हा कागद पोस्ट करताना मलिक यांनी त्यावर समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा इथूनच सुरू झाला, असं म्हटलं आहे. मलिक यांनी पोस्ट केलेलं सर्टिफिकेट हे विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट असावं आणि त्यांच्या पहिल्या लग्नाचं हे सर्टिफिकेट असावं असं सांगितलं जातं. मात्र, हे सर्टिफिकेट नेमकं कसलं आहे याला कुणीही दुजोरा दिलेला नाही.
Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा pic.twitter.com/rjdOkPs4T6
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
समीर वानखेडेंची प्रतिक्रिया काय
दरम्यान, आपल्याबाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात आहेत. आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. माझ्याबाबत जो जन्माचा दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. आपल्या विरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. याला आपण कायदेशीर उत्तर देऊ, याबाबत आपण लवकरच जाहीर खुलासा करणार आहोत, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती
समीर वानखेडे हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत. क्रांती आणि समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली होती. त्यांना जुळी मुलंही आहेत. क्रांती रेडकर यांचे ‘कोंबडी पळाली’ हे जत्रा चित्रपटातील गाणं अत्यंत गाजले आहे. याशिवाय माझा नवरा तुझी बायको, फुल थ्री धमाल यासारख्या अनेक सिनेमात त्या झळकल्या आहेत. कांकण या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.
कोण आहेत समीर वानखेडे?
महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.
समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
कोणकोणत्या पदांवर काम
2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
संबंधित बातम्या :
कोण आहेत समीर वानखेडे ज्यांच्या रेडमध्ये शाहरुखच्या मुलासह बडे बडे सापडलेत?
‘समीर दाऊद वानखेडे’, नवाब मलिक म्हणतात, फ्रॉड इथून सुरु होतो, समजून घ्या नेमकं काय?