VIDEO: एनसीबीचे धाडसत्रं, संजय राऊत म्हणतात, याप्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत

प्रभाकर साईल यांचा व्हिडीओ आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. (NCB's raid connection with Delhi, says sanjay raut)

VIDEO: एनसीबीचे धाडसत्रं, संजय राऊत म्हणतात, याप्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत
sanjay raut
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 11:10 AM

मुंबई: प्रभाकर साईल यांचा व्हिडीओ आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही मागणी केली. हे षडयंत्र आहे. पैशाचा खेळ आणि मनी लाँड्रिंग झालीय. ईडीने याची चौकशी करावी. आत बसलेल्या व्यक्ती कोण आहेत? आता हा खेळ सुरू झाला आहे, असं सांगतानाच प्रभाकर साईल या प्रकरणातील साक्षीदार आहे. त्याचा बालही बाका होणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत. या मुलाने मोठं धाडस केलं. त्याने देशावर उपकार केले. मी त्याच्या धाडसाचं कौतुक करतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. आता मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीची स्टोरी बाहेर येईल, असं राऊत म्हणाले.

साईलचे देशावर उपकार

साईल हा अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याची सुरक्षा केली पाहिजे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांशी बोललो. राज्याला बदनाम करण्याचं षडयंत्रं रचलं गेलं. त्याला काही अधिकाऱ्याने हे बिंग फोडलं. पण या मुलाने बिंग फोडलं. त्याच्या साहसाला मी दाद देतो. त्याने देशावर उपकार केले, असंही त्यांनी सांगितलं.

तथ्य आणि सत्य धक्कादायक

वसुली गँग कुणाच्या होत्या. मी सांगितलं ना. इंटरव्हलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा स्क्रिनप्ले मी तुम्हाला सांगेन, असं सांगतानाच या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होतं त्याची चौकशी झाली पाहिजे, असं राऊत म्हणाले.

तुमच्या काळजाला वार झाला

भाजपने या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सीबीआयची चौकशी व्हावी. जरुर व्हावी. सीबीआय तुमच्या खिशात आहे ना? तुम्हीही अनेक व्हिडीओ बाहेर आणले. पण तुमच्या काळजाला वार झाला. तुम्ही म्हणताय ना चौकशी करा… करा. अजून दहा व्हिडीओ मी तुम्हाला देतो, करा चौकशी, असं आव्हानच त्यांनी दिलं.

सॅम मनी लाँड्रिंगमध्ये

केपी गोसावी, परमबीर सिंग कुठे हे भाजपला माहीत असेल. गोसावीचा घातपात झाला की नाही हे ज्याने शंका उपस्थित केली. तेच सांगू शकतील. किंवा त्यांचे समर्थक पार्टीच सांगेल, असं ते म्हणाले. या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. सॅम डिसोजाचा संदर्भ मनी लॉन्ड्रिंगमध्ये येते. बड्या लोकांचे पैसे तो परदेशात पाठवतो. माझी मागणी आहे या प्रकरणाची चौकशी करावी, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

‘समीर दाऊद वानखेडे’, नवाब मलिक म्हणतात, फ्रॉड इथून सुरु होतो, समजून घ्या नेमकं काय?

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल

आई-बहिणीला दिलेल्या त्रासाचा वचपा, पॅरोलवर सुटलेल्या बापाची मुलाकडून हत्या

(NCB’s raid connection with Delhi, says sanjay raut)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.