ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच, भुजबळांवर सोपवली न्यायालयीन लढाई; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच, भुजबळांवर सोपवली न्यायालयीन लढाई; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
nawab malik
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 1:26 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाबाबतची न्यायालयीन प्रकरणाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी माहिती दिली.आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे यावर चर्चा झाली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहील असेही बैठकीत ठरले. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याचेही बैठकीत ठरल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे सर्व कार्यक्रम रद्द

या बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरही चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच पक्षाने नियोजित शिबीर व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दी होणार नाही असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नये असा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. मात्र मंत्री आणि पालकमंत्री व संपर्कमंत्री त्या – त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतील, असंही ठरल्याचं त्यांनी सांगितलं.

निवडणुकांसाठी आम्ही तयार

पक्षातंर्गत होणार्‍या निवडणूकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय ज्या आगामी निवडणूका होणार आहेत त्याची तयारी पक्षाने केली आहे. तसेच स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी करण्यासाठी स्थानिक पातळीवरच निर्णय घ्यावेत असंही या बैठकीत ठरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Coronavirus: क्वॉरंटाईनपासून ते लॉकडाऊनपर्यंत… बैठकीत काय निर्णय घेतले?; राजेश टोपेंनी दिले प्रत्येक प्रश्नांचे उत्तर

MP Vinayak Raut| राणे कुटुंबाचा पिंड विकृतीचा, तर दानवे विनोदी बोलतात; विनायक राऊतांकडून टीकेची झोड

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : आरटीपीसीआर सोबत रॅपिड अँटिजेन चाचणी करणार : राजेश टोपे

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.