जयंत पाटील शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना भेटणार; ‘या’ विषयावर होणार चर्चा

अलमट्टी धरणातून होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे पश्चिम महाराष्ट्राला पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यात उद्या शनिवारी बैठक होणार आहे. (almatti dam water issue)

जयंत पाटील शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना भेटणार; 'या' विषयावर होणार चर्चा
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 12:53 PM

मुंबई: अलमट्टी धरणातून होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे पश्चिम महाराष्ट्राला पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यात उद्या शनिवारी बैठक होणार आहे. अलमट्टीतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण होणाऱ्या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. (ncp leader jayant patil to meet karnataka cm yediyurappa over almatti dam water issue)

उद्या शनिवारी सकाळी 10.30 वाजता ही बैठक होणार आहे. जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार आहे, असेही त्यांनी सांगितलं.

पुनरावृत्ती होऊ नये म्हणून…

सातारा, सांगली भागात 2019 मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आम्ही कायमच प्रयत्नशील आहोत. मागील वर्षी देखील राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूर परिस्थिती टाळली होती. पूर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून यापूर्वी कर्नाटक राज्यासोबत मुख्य अभियंता व सचिव स्तरावरील चर्चा झालेल्या आहेत. याबाबतीतच मी उद्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

पूरस्थितीन नियंत्रणावर बैठकीत भर

या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान- प्रदान यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित करणे, कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन, पूर नियंत्रण व व्यवस्थापनासाठी विविध स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा व इतर तदनुषंगिक मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (ncp leader jayant patil to meet karnataka cm yediyurappa over almatti dam water issue)

संबंधित बातम्या:

सर्व्हे : कृष्णा सहकारी साखर कारख्यान्याच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी?

Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी

केंद्राने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा द्यावा; सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार: विजय वडेट्टीवार

(ncp leader jayant patil to meet karnataka cm yediyurappa over almatti dam water issue)

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.