राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

nawab malik: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या ते वैद्यकीय कारणामुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहे. शनिवारी नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक हिने दिली.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
nawab malik
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 1:01 PM

कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या ते वैद्यकीय कारणामुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहे. शनिवारी दुपारी नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक हिने दिली. त्यानंतर त्यांना कुर्ला येथील रुग्णालयात आप्तकालीन कक्षात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. त्यांना श्वसनासंदर्भात त्रास होऊ लागल्यानंतर ते रुग्णालयात आले. मलिक यांच्यावर आता कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ईडीने केली अटक, सध्या वैद्यकीय जामिनावर

नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भात ईडीकडून त्यांची चौकशी सुरु होती. या कारणात त्यांच्यावर ईडीने अटक करण्याची कारवाई केली. अटक केल्यानंतर अनेक दिवस ते तुरुंगात होते. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणामुळे त्यांना जामीन मिळाला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर नवाब मलिक अजित पवार यांच्यासोबत राहिले. विधिमंडळ अधिवेशनात ते सत्ताधारी गटात बसले होते. त्यावरुन टीका झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिले होते. “सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…”, असे कॅप्शन असलेले हे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन नवाब मलिक यांच्या महायुतीमधील प्रवेशाला विरोध केला होता. मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते.

हे सुद्धा वाचा

सध्या मलिक अजित पवार गटात आहेत. परंतु सार्वजनिक कार्यक्रमात ते आता दिसत नाहीत. प्रकृतीच्या कारणामुळे ते राजकीय व्यासपीठावरुन सध्या लांब आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.