सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे यांची हजेरी? चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडलीय. शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन गटात पक्ष विभागला गेलाय. दोन्ही गटाची आता कायदेशीर लढाई सुरु आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जातोय. असं असताना एक महत्त्वाची माहिती समोर आलीय.

सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे यांची हजेरी? चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 11:14 PM

मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर पाहून खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार या आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. असं असताना आता एक महत्त्वाची माहिती समोर आलीय. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला खुद्द सुप्रिया सुळे यांनीदेखील हजेरी लावली होती, असं स्पष्ट झालंय. कार्यक्रमातील कलाकारांच्या फोटोंमुळे या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी एका महिला कलाकारासोबतचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. त्यांनी या कलाकाराचं कौतुक केलंय. या कलाकाराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबतचे फोटो दिसत आहेत. या महिला डान्सरने सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आपण परफॉर्मन्स केल्याची माहिती इन्स्टाग्रामवर दिलीय. या फोटोंमधून सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे राष्ट्रवादीची अंतर्गत लढाई ही फक्त दिखावा आहे की खरंच फूट आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात मोठी फूट पडलीय. राष्ट्रवादीचे दोन्ही गट निवडणूक आयोगात गेले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टातही प्रकरण गेलं आहे. असं असताना सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राजकारण एकीकडे आणि वैयक्तिक संबंध एकीकडे असं खरंच यातून स्पष्ट होतं की याचा वेगळा काही अर्थ निघतो का? ते आगामी काळात स्पष्ट होईल. पण सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.