राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली, प्रदेशाध्यक्ष बदलणार? छगन भुजबळ यांचंही सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांनी नुकतीच याबाबत महत्त्वाची मागणी केलीय. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली, प्रदेशाध्यक्ष बदलणार? छगन भुजबळ यांचंही सूचक वक्तव्य
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 7:10 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. आगामी काळामध्ये देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यानंतर देशात लोकसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर आता पक्षात आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची 28 जूनला राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही बैठक होणार आहे. पक्षातील विविध संघटनात्मक बदलाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतंच आपल्याला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जबाबदारी द्या, अशी मागणी केली. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष होऊन 5 वर्ष 1 महिन्याचा कालावधी उलटला आहे, असं म्हटलं. वास्तविक पक्षाच्या घटनेनुसार तीन वर्षांनी प्रदेशाध्यक्ष बदलणं अपेक्षित असतं. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी इतर नेत्याकडे जाऊ शकते. याबाबतच्या चर्चा सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी समाजाला प्रदेशाध्यक्षपद मिळावं, असं म्हणत प्रदेशाध्यक्ष पदाबाबतची इच्छा व्यक्त केली.

छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं. भुजबळ यांनाही प्रदेशाध्यक्षपद हवं, अशी चर्चा रंगू लागली. त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

“सर्वच पक्षांमध्ये दर 3-5 वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका होत असतात. अजित दादांनी सर्वांसमोर इच्छा प्रदर्शित केली. लोकं म्हणतात अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून इफेक्टिव्ह काम करत नाहीत. मग मी त्यांची गचंडी धरू का? असे अजित पवार म्हणाले. मी सुद्धा दादांसोबत भांडायला असतो. अजित दादांनी पक्षाचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“2 महत्वाची पदे ही पक्षात असतात. त्यात विधानसभेतील प्रमुख आणि पक्षातील प्रांतप्रमुख. एका मोठ्या समाजाकडे जर एक महत्वाचं पद दिलं तर दुसऱ्या छोट्या समाजाकडे दुसरं पद द्यायला हवं. ही पवारांची परंपरा होती. मी तीच अपेक्षा व्यक्त केली”, असं भुजबळांनी सांगितलं.

“राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर काँग्रेस फुटली असं भाजपला वाटून त्यांनी एकत्र निवडणुका घेतल्या. पण जनतेने काँग्रेस आणि आम्हाला कौल दिला. मी उपमुख्यमंत्री असताना बबनराव पाचपुते यांना प्रदेशाध्यक्ष केलं. पण पुढे बदल होत गेला. भाजपमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट सुद्धा नाकारलं. पण आज ते ओबीसी असल्याने त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं”, असं छगन भुजबळ म्हणाले.

‘शरद पवार सर्वात लोकप्रिय नेते, तरी 50-60 जागांच्या वर जाऊ शकलो नाही’

“काँग्रेसने कुणबी समाजाचे नाना पटोले यांना अध्यक्ष केलं. शिवसेनेत राऊत हे ओबीसी आहेत. आमच्याकडे असलेला अनेक ओबीसी समाज हा भाजपमध्ये गेला. अजित दादांनी सांगितलं ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी एकट्याच्या जीवावर राज्य मिळवलं. पण शरद पवार सर्वात लोकप्रिय नेते असतांना आपण 50-60 जागांच्या वर जाऊ शकलो नाही”, अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

प्रदेशाध्यक्ष पदाच्या वक्तव्यावर भुजबळांचं स्पष्टीकरण

“जास्तीत जास्त समाजाला आपण आकर्षित करू शकलो तर आपल्याला मत जास्त भेटतील. ओबीसी समाजाचा कोणीतरी एकाला मोठ्या पदावर द्या. जितेंद्र आव्हाड, धनंजय मुडे, सुनील तटकरे आहेत. जर कोणी नाही झालं तर छगन भुजबळ आहे, असं मी म्हंटलं. वर्तमान पत्रात आलं की,मला व्हाययचं पण असं नाही. छोट्या समाजाला पद द्या, असं मी म्हंटल”, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं.

“एका समाजाची छाप आपण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत इतर मतदार आपल्याकडे येणार नाही. इतर पक्ष जर याचा विचार करतात तर आपणही करायला हवा, असं माझं मत आहे. शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पण आम्ही सुचना करत असतो. काँग्रेसने सुद्धा मुंबईत दलित समाजाची भगिनी अध्यक्ष केली. त्यामागे काही उद्देश आहे. कारण त्या समाजाला आकर्षित करत असतात”, असं भुजबळ म्हणाले.

‘अजित पवारांचा गट वैगेरे नाही’

“अजित पवारांचा गट वैगेरे नाही. शरद पवार हाच आमचा गट आहे. अजित पवारांनी सूचना केली आहे. शरद पवार यांच्या म्हणण्याच्या एक इंच सुद्धा अजित पवार पुढे जात नाहीत”, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

“ओबीसी समाजाला मोठं पद भेटलं तर निश्चित फायदा होईल. आमच्या अनुभवाप्रमाणे शरद पवारांनी सांगितलेलं काम करत असतो. प्रदेशाध्यक्षपद मला भेटलं तरी प्रॉब्लेम नाही. पण मी अडून बसलेलो नाही. पक्षाची प्रतिमा सुधारवायची आवश्यकता असेल तर इतर छोट्या समाजाला पद द्यावं असं माझं मत आहे. आतल्या आत इतर पक्ष सुद्धा आमच्या विरोधात प्रचार करत असतात. त्यामुळे माझं मत ऐकल्यास फायदा निश्चित होणार”, असं मत छगन भुजबळ यांनी मांडलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.