NCP Protest : हुकूमशाही कराल तर जनताच धडा शिकवेल, आरे मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करत सरकारला राष्ट्रवादीचा इशारा

सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, इथे हुकूमशाही नाही. राष्ट्रवादी संविधानानुसार चालणारा पक्ष आहे. जर संविधानाच्या विरोधात कुणी गेले तर त्याला जनताच धडा शिकवते, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

NCP Protest : हुकूमशाही कराल तर जनताच धडा शिकवेल, आरे मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करत सरकारला राष्ट्रवादीचा इशारा
आरे मेट्रो कारशेडविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 1:58 PM

मुंबई : आरेमध्ये झाडे तोडून मेट्रो कारशेड (Aarey metro carshed) बनवू नये, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. आज राष्ट्रवादीसह विविध पक्ष आणि संघटनांनी आरेमधील मेट्रो कारशेडविरोधात एकत्र येत आंदोलन केले. आरेऐवजी कुठेतरी मेट्रो कार्ड संच बनवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेड बनवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होणार आहे. यामुळेच सरकारच्या या निर्णयाला विविध पक्ष आणि संघटनांकडून विरोध (Protest) होत आहे. अनेक पर्यावरणवादी संघटनादेखील याठिकाणी आंदोलने करीत आहेत. मागील आठवड्यात काँग्रेसने मोठे आंदोलन याठिकाणी केले होते. तर आज राष्ट्रवादीसह (NCP) विविध पक्ष आक्रमक होत, घोषणाबाजी करत आंदोलन करीत आहेत. हातात फलक घेऊन, सरकारच्या विरोधात आणि आरे वाचविण्याच्या घोषणा आंदोलक देताना दिसत होते.

मुंबईकर एकवटले

मुंबईची सध्याची स्थिती पाहत शहरात प्रचंड प्रदुषण झाले आहे. पर्यावरणाची मोठी हानी होताना दिसून येत आहे. आम्ही मुंबईत लहानाचे मोठे झालो. मुंबई हीच आमची कर्मभूमी आहे. त्यामुळे या प्रदुषणाच्या विरोधात मुंबईकर एकवटले आहेत. या आंदोलनात सर्व मूळ मुंबईचे रहिवासी सहभागी झाले आहेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्या आणि आर्ट कल्चर फिल्म सेंटरच्या मुंबई प्रेसिडेंट डॉ. देवयानी बेंद्रे म्हणाल्या.

‘लोकशाही पद्धतीने सरकारच्या निर्णयाला विरोध’

मुंबईकरांना आरेची काय किंमत आहे, याची जाणीव आहे. आता येथे जी हिरवळ दिसत आहे, भविष्यात ती दिसेल याची गॅरंटी नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहोत. सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, इथे हुकूमशाही नाही. राष्ट्रवादी संविधानानुसार चालणारा पक्ष आहे. जर संविधानाच्या विरोधात कुणी गेले तर त्याला जनताच धडा शिकवते, असा इशाराही बेंद्रे यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

‘ही आमची, मुंबईकरांची प्रॉपर्टी’

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. अशावेळी सरकारला जर हुकूमशाही पद्धतीने वागायचे असेल, तर वागू द्या. हीच हुकूमशाही लोक मुळासकट उघडून टाकतील. ही आमची, मुंबईकरांची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे सरकारला असे करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. या ईडी सरकारला मुंबईकर धडा शिकवतील, असा इशारा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पंकज चंदनशिवे यांनी दिला आहे.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.