‘लेटरबॉम्ब’ कट कसा शिजला?; राष्ट्रवादीच्या युवा नेत्याने केला ‘हा’ दावा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. (ncp youth leader's tweet on parambir singh's letter bomb)

'लेटरबॉम्ब' कट कसा शिजला?; राष्ट्रवादीच्या युवा नेत्याने केला 'हा' दावा
Parambir Singh
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 8:36 PM

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या लेटरबॉम्बवर अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. सिंग यांचे बोलविते धनी कुणी आहे का? असा सवालही केले जात आहेत. मात्र,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी नवाच गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. (ncp youth leader’s tweet on parambir singh’s letter bomb)

रविकांत वरपे यांनी एक ट्विट करून हा गौप्यस्फोट केला आहे. लेटरबॉम्ब कट कसा जन्माला आला? परमबीर सिंगांची पत्नी काही कंपन्यांत भागीदार आहेत. पोलीसांकडून टीआरपी घोटाळ्याची चौकशी सुरू होताच एका कंपनीला ईडीची नोटीस आली. मग विदर्भातील नातेवाईक आमदाराद्वारे सिंगांनी महाराष्ट्र ‘विरोधी’ नेत्याची आणि दिल्ली‘शहां’ची भेट घेतली. तूर्तास एवढेच, बाकी लवकरच!, असं ट्विट वरपे यांनी केलं आहे. त्यामुळे लेटरबॉम्बमागे फार मोठं षडयंत्र असल्याचं दिसून येत आहे.

वरपेंचा रोख नेमका काय?

वरपे यांनी या ट्विटमध्ये थेट कुणाची नावं घेतलेली नाहीत. परंतु त्यांनी समजतील असे संकेत दिले आहेत. त्यामुळे या सर्व खेळीमागे भाजप असल्याचं त्यांना म्हणायचं आहे. परंतु वरपे यांनी भाजपचा थेट उल्लेख केलेला नाही. टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीला ब्रेक लागण्यासाठी सिंग यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली. त्यानंतर राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी लेटरबॉम्ब टाकला. लेटरबॉम्ब टाकण्यापूर्वी ते दिल्लीतील भाजपच्या आणि महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला भेटले होते, असे संकेत वरपे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता राजकारणीच नव्हे तर अधिकाऱ्यांनाही ईडीचा धाक दाखवला जात आहे का? ईडीचा धाक दाखवून अधिकाऱ्यांचा वापर केला जात आहे का? असा सवाल केला जात आहे.

आज काय घडले?

दरम्यान, आज अँटालिया बॉम्बस्फोट प्रकरणी सहायक निरीक्षक सचिन वाझे यांना 3 एप्रिलपर्यंत विशेष एनआयए न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. वाझेंकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी असल्याने त्यांची कोठडी देण्याची मागणी एनआयएने कोर्टाला केली होती. यावेळी एनआयएने सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं कोर्टाला सांगितलं. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांना वाझेंच्या समोर बसवून तपास करायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी एनआयएने केली आहे. त्याशिवाय वाझेंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा रिपोर्ट यायचा बाकी आहे. तसेच वाझेंच्या गाडीतून मिळालेले पुरावे फोरेन्सिक पुराव्याशी पडताळणी करून पाहायचे आहे. डीएनए मॅच करण्यासाठी पाचही गाड्यांचे सँपल घेण्यात आले आहेत. शिवाय आरोपीने सीसीटीव्ही डीव्हीआर गायब केला असून तोही शोधायचा आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आरोपीने 12 लाख रूपये दिले होते. त्याचीही माहिती घ्यायची असल्याचं एनआयएने कोर्टात सांगितलं आहे. याशिवाय वाझेंच्या आवाजाचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे. (ncp youth leader’s tweet on parambir singh’s letter bomb)

संबंधित बातम्या:

मनसुख हिरेन-सचिन वाझेंची 17 फेब्रुवारीला भेट, CSMT भागातील सीसीटीव्ही फूटेज समोर

मनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले; एटीएसच्या हाती मोठा पुरावा

सचिन वाझेंचे DNA सॅम्पल तपासणार, ‘त्या’ कारमध्ये सापडलेल्या साहित्याशी पडताळणी

(ncp youth leader’s tweet on parambir singh’s letter bomb)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.