ब्रिटन, महाराष्ट्र आणि एक नेगेटीव्ह असलेली मोठी पॉझिटीव्ह बातमी

कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रचंड कडक नियम करण्यात आले आहेत (Nearly 600 hundred passengers came from UK at Mumbai Airport).

ब्रिटन, महाराष्ट्र आणि एक नेगेटीव्ह असलेली मोठी पॉझिटीव्ह बातमी
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 3:40 PM

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची (Corona Virus) नवी प्रजाची आढळली आहे. हा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा जास्त घातक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या सगळ्या विमानांवर बंदी घातली. या नव्या विषाणूला कोरोना स्ट्रेन (Corona Strain) म्हटलं जात आहे. भारत कोरोना संकटाची प्रचंड झळ सोसत असताना आणखी कोरोना स्ट्रेनची साथ भारतात आली तर कठीण होऊन बसेल. त्यामुळे देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रचंड कडक नियम करण्यात आले आहेत. कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर कशाप्रकारचं नियोजन करण्यात आलं आहे, याबाबतची माहिती मुंबईचे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली (Nearly 600 hundred passengers came from UK at Mumbai Airport).

“काल (21 डिसेंबर) रात्रीपासून युकेहून आलेल्या प्रवाशांपैकी एकही पॉझिटीव्ह व्यक्ती सापडलेली नाही. काल रात्री आणि आज (22 डिसेंबर) दिवसभरात मिळून 5 फ्लाईट येणार होत्या. यापैकी 1 फ्लआईट रद्द झाली. त्यामुळे 3 फ्लाईट आल्या आहेत. अजून आज रात्री एक विमान येणं बाकी आहे”, असं सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

“जे तीन विमाने आले त्यामध्ये 600 प्रवासी आले. आलेल्या सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या प्रवाशांची पाच दिवसांनंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येईल. सध्यातरी या घडीला आलेल्या प्रवाशांपैकी कुणीही पॉझिटीव्ह नाही”, अशी माहिती त्यांनी दिली (Nearly 600 hundred passengers came from UK at Mumbai Airport)..

“युकेतून आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच बोर्ड करण्याची परवानगी. युकेहून येणाऱ्या फ्लाईट आज रात्रीपासून बंद होणार आहेत. शेवटची एकच फ्लाईट रात्री 11 वाजता येण्याची बाकी आहे”, असं काकाणी यांनी सांगितलं.

“मिडल ईस्ट आणि वेस्ट युरोपमधून येणाऱ्या प्रवाशांनाही क्वारंटाईन केले जात आहे. युकेहून ब्रेक जर्नीसाठी देशांतर्गत प्रवास करुन जे असतील त्यांच्यासाठी त्या त्या राज्यांमधील नियम लागू होतील. दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच बोर्ड करण्याची परवानगी असेल. रिपोर्ट नसल्यास विमानतळावरच टेस्ट केली जाईली”, अशी माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली.

“ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांव्यतिरीक्त इतर युरोप आणि मिडल ईस्टमधूनही जे प्रवासी येत आहेत त्यांनाही क्वारंटाईन केले जात आहे. जर पॉझिटिव्ह आले तर सेव्हन हिल्स आणि जिटी हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात येते आहे”, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

संबंधित बातम्या : 

कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे ब्रिटनमध्ये खळबळ, भारतातही आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची बैठक

नव्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी मुंबई सज्ज, लंडन रिटर्नवाल्यांची बडदास्त, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Night Curfew: महाराष्ट्रात आजपासून नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.