BJP: मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांवर नवी जबाबदारी, मुंबई महापालिका निवडणुका कधी?

आशिष शेलार यांच्याकडे आता गुजरात विधानसभा निवडणुकांची जबाबदारी दिल्याने मुंबई महापालिका निवडणुका पुढच्या वर्षी होतील, अशी चर्चा रंगली आहे. भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला पार पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

BJP: मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांवर नवी जबाबदारी, मुंबई महापालिका निवडणुका कधी?
नवी जबाबदारीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 8:35 PM

मुंबई – अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकांची (BMC Election 2022)जबाबदारी भाजपाने ज्या आशिष शेलार यांच्याकडे सोपवली होती. त्यांच्यावर आता नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष ऍड आशिष शेलार (Ashish Shelar)यांच्यावर आता गुजरात विधानसभा निवडणुकीत सूरतची (Surat)जबाबदारी देण्यात आली आहे. सूरतमध्ये 10 विधानसभा मतदार संघांची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. आशिष शेलार यांच्या टीममधील काही सहकारी उद्या सुरतला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

गेल्या निवडणुकीतही चांगली कामगिरी

मागील गुजरात विधानसभा निवडणुकीत आशिष शेलार आणि त्यांच्या टीमने सूरतमध्ये चांगली कामगिरी केली केली होती. त्यामुळे यंदाही शेलार आणि त्यांच्या टीमवर्कवर केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला आहे. आशिष शेलार आणि त्यांचे सहकारी हे पुढचे काही महिने सूरतमध्ये व्यस्त राहणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुका कधी?

आशिष शेलार यांच्याकडे आता गुजरात विधानसभा निवडणुकांची जबाबदारी दिल्याने मुंबई महापालिका निवडणुका पुढच्या वर्षी होतील, अशी चर्चा रंगली आहे. भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला पार पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे, पण आशिष शेलार यांच्या गुजरात निवडणुकीतील सहभागाने मुंबई महापालिका निवडणुक पुढे ढकलली जाण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई महापालिकेी जबाबदारी आशिष शेलारांकडे

राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतील भाजपाचे बडे नेते आशिष शेलार यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र आशिष शेलार यांच्याकडे भाजपासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महापालिका निवडमुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शेलार यांनी भाजपाला मुंबईत चांगले यश मिळवून देत 82 जागा निवडून आणल्या होत्या.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.