विमानदेखील उतरू शकेल असे रस्ते बांधले, विकास झाला पाहिजे पण वरवर काम करून चालणार नाही; नितीन गडकरींच्या कानपिचक्या

केवळ राज्याचा विकास झाला पाहिजे असं म्हणून चालणार नाही. राज्याचा विकास झाला पाहिजे तर वरवर काम करून चालणार नाही. त्यासाठी गंभीरपणे काम केलं पाहिजे, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.

विमानदेखील उतरू शकेल असे रस्ते बांधले, विकास झाला पाहिजे पण वरवर काम करून चालणार नाही; नितीन गडकरींच्या कानपिचक्या
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 5:12 PM

मुंबई: केवळ राज्याचा विकास झाला पाहिजे असं म्हणून चालणार नाही. राज्याचा विकास झाला पाहिजे तर वरवर काम करून चालणार नाही. त्यासाठी गंभीरपणे काम केलं पाहिजे, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी सांगितलं. आम्ही देशभरात रस्त्यांचं जाळं निर्माण केलं आहे. देशातील 20 रस्ते असे आहेत की तिथे विमान सुद्धा उतरू शकतं, असं गडकरी यांनी सांगितलं. आपण संपूर्ण महाराष्ट्राचा (maharashtra) विचार केला पाहिजे. मी राज्यात 5 लाख कोटींचे रस्ते (road) बनवले आहेत. 1947 साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 75 टक्के लोक गावात राहत होते. मात्र आता 25 टक्के लोक गावात राहतात. गावात सोयीसुविधा आणि साधन नसल्याने नाईलाजाने लोक शहरात आलीत. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागाची परिस्थिती खराब आहे तीच परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याची आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं.

नितीन गडकरी यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. मी देशात असे 20 रस्ते बांधले जिथे विमान देखील उतरू शकतं. सांगलीत एक लॉजिस्टिक पार्क बांधणार आहोत, तिथल्या रस्त्यावर विमान देखील उतरेल. वॉटर टॅक्सी सुरू करायच्या आहेत. ज्या दक्षिण मुंबईतून 13 मिनिटात नवी मुंबई एअरपोर्टला जातील, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

तांदूळ-मक्यापासून इथेनॉल तयार करणार

यावेळी त्यांनी इथेनॉलबाबतची चिंताही व्यक्त केली. आज देशात साडे चारशे कोटीच्या इथोनॉलची गरज आहे. पेट्रोलमध्ये टाकण्यासाठी 10 टक्के इथेनॉलही आपल्याकडे नाही. पेट्रोलवर चालणारी वाहने आता 100 टक्के बायो इथेनॉलवर चालू शकतात. आता आम्ही मका आणि तांदूळ यापासून इथेनॉल बनवण्याची परवानगी दिली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची मुख्य समस्या म्हणजे आपण आपली पॉवर खर्च करत आहोत, असं नितीन गडकरी म्हणाले.

संबंधित बातम्या:

#LataMangeshkar : लता मंगेशकर व्हेंटिलेटरवर; लवकर बऱ्या व्हा, सोशल मीडियावर लोक करताहेत प्रार्थना

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात, “कार उद्ध्वस्त झाली, जीव वाचला” अपघातानंतर भावूक पोस्ट

भारतातली सर्वात महागडी कार मुकेश अंबानींच्या ताफ्यात, किंमत ऐकून थक्क व्हाल! केवळ VIP नंबरसाठी 12 लाख

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.