मुंबईकरांवर कराचा बोजा नाही, महापालिकेचा 33 हजार 441 कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी आज (4 फेब्रुवारी) स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला (BMC Budget 2020-21). या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारचा करवाढीचा बोजा लादण्यात आलेला नाही.

मुंबईकरांवर कराचा बोजा नाही, महापालिकेचा 33 हजार 441 कोटींचा अर्थसंकल्प सादर
Follow us
| Updated on: Feb 04, 2020 | 4:06 PM

मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी आज (4 फेब्रुवारी) स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला (BMC Budget 2020-21). या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारचा करवाढीचा बोजा लादण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी 33 हजार 441 कोटींचं बजेट सादर केलं. गतवर्षीपेक्षा यंदाच्या बजेटमध्ये जास्त पैशांची तरतूद करण्यात आली आहे (BMC Budget 2020-21). आर्थिक वर्ष 2019-2020 साठी 30 हजार 692 कोटींचं बजेट सादर करण्यात आलं होतं. मात्र, यावर्षीच्या बजेटमध्ये 2 हजार 749 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

बेस्टसाठी 1500 कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये बेस्टसाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम कर्जाची परतफेड, वेतन व्यवस्थापनाबाबत आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे, आयटीएमएस प्रकल्पाची अंमलबजावणी यासाठी वापरली जाणार आहे.

रस्ते आणि वाहतूक विभागासाठी 1600 कोटींची तरतूद

रस्ते आणि वाहतूक विभागाअंतर्गत 2020-21 मध्ये रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये 1600 कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय फुटपाथच्या दुरुस्तीसाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षणासाठी 2944.59 कोटींची तरतूद

शिक्षण क्षेत्रासाठी 2944.59 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळांसाठी तसेच अवकाश संशोधनाचे शिक्षण, डिजीटल दुर्बीण आणि वेधशाळेसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

उद्यान खात्यासाठी 226.77 कोटी तर अग्निशमन दलासाठी 104 कोटींची तरतूद

याशिवाय, मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये उद्यान खात्यासाठी 226.77 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलासाठी 104 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पर्यटनासाठी 183.03 कोटींची तरतूद

मुंबई महानगरपालिकेने पर्यटनासाठी एक समर्पित विभाग तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यातील दैनंदिन उपक्रम तज्ञ आणि मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंट्सद्वारे चालविले जातील. पर्यटन आणि हेरिटेजसाठी अर्थसंकल्पात 183.03 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महिलांच्या वसतिगृहासाठी 10 कोटींची तरतूद

पश्चिम उपनगरात कार्यरत महिलांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीसुविधांनी युक्त वसतिगृह बनणार आहे.

इनक्यूबेशन लॅबसाठी 15 कोटींची तरतूद

मुंबई महानगरपालिकेला मदत करण्यावर भर असलेल्या स्टार्टअप कल्पनांना मुंबई इनक्यूबेशन लॅबमार्फत आर्थिक मदत दिली जाईल. त्यासाठी मुंबई इनक्यूबेशन लॅबसाठी एकूण 15 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आगामी वर्षात नोकरभरती नाही

उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र, त्यासाठी कोणत्याही प्रकारची नोकरभरती आगामी वर्षात होणार नाही, अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी बजेट सादर करताना केली.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.