AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात निर्बंधात सूट नाहीच, उलट वाढवले जाणार, काय सुरु, काय बंद?

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील कोरोना निर्बंधांबाबत महत्वाची घोषणा केलीय. यानुसार 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आलेत.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात निर्बंधात सूट नाहीच, उलट वाढवले जाणार, काय सुरु, काय बंद?
ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल त्या दिवशीपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार
| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 5:56 PM
Share

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील कोरोना निर्बंधांबाबत महत्वाची घोषणा केलीय. यानुसार 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आलेत. मात्र, निवडक 11 जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता तेथील निर्बंध काय असणार आहेत. गरज पडल्यास कोरोना नियंत्रणासाठी या ठिकाणी निर्बंध वाढवलेही जातील. याबाबत लवकरच शासन आदेश निघेल असंही टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे या 11 जिल्ह्यांमधील जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतंय याकडे अनेकांचं लक्ष लागलंय.

राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये शिथिलता येईल. परंतु, बाकीच्या 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 मध्येच ठेवलं जाईल. यात पश्चिम महाराष्ट्रातील 5 आणि कोकणातील साधारणपणे 4, मराठवाड्यातील बीड जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध राहतील. बाकी जिल्ह्यांना बऱ्याच अंशी निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाईल.”

कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम?

  1. पुणे
  2. सोलापूर
  3. कोल्हापूर
  4. सांगली
  5. सातारा
  6. रत्नागिरी
  7. रायगड
  8. सिंधुदूर्ग
  9. पालघर
  10. नगर
  11. बीड

लेव्हल 3 चे नियम

१. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

२. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

३. मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.

४. रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार 50% बैठक क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी 4 वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.

५. उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..

६. सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 9 पर्यंत सुरू राहतील.

७. खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.

८. कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) 50% क्षमतेने सुरू राहतील.

९. क्रीडा- सकाळी 5 वा.पासून सकाळी 9 वा./ सायं 6 वा. पासून सायं.9 पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.

१०. चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. ११ . सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक 50% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

१२. लग्न समारंभ फक्त 50 लोकांच्या मर्यादेतच करता येतील.

१३. अंत्यसंस्कार विधी फक्त 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.

१४. बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या 50 टक्के बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.

१५. बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.

१६. कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.

१७. ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.

१८. जमावबंदी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील.

१९. व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.

२०. सार्वजनिक परिवहन सेवा 100% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.

२१ . मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे 3 ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.

२२. खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.

२३. उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.

उत्पादनाच्या अनुषंगाने :

१. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन _ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)

२. सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)

३. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन

४. अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

हेही वाचा :

25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता, 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम; राजेश टोपे यांची घोषणा

11 जिल्ह्यात लेवल 3चे निर्बंध कायम, राजेश टोपेंची घोषणा, तुमचा जिल्हा आहे का? तपासा एका क्लिकवर

कोरोना व्हॅक्सिनच्या मॉडेलनुसार प्लेगची व्हॅक्सिन तयार; 40 लोकांवर होणार ट्रायल

व्हिडीओ पाहा :

No relief in restriction for Pune and West Maharashtra say Rajesh Tope

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.