Nitin Gadkari: जो प्रदेशाध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो.. फडणवीस दिल्लीत गेले तर बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाची संधी.. काय म्हणाले नितीन गडकरी?

विधानसभेचे तिकिट नाकारल्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया न देता, नाराजी व्यक्त न करता त्यांनी ज्या तडफेने काम केले, त्यात त्यांची कार्यकर्ते होण्याच्या परीक्षेत ते पास झाल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रश्नांची मालकी घेण्याची आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची धडाडी बावनकुळे यांच्याकडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Nitin Gadkari: जो प्रदेशाध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो.. फडणवीस दिल्लीत गेले तर बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाची संधी.. काय म्हणाले नितीन गडकरी?
बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाची संधी- गडकरी
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 8:18 PM

नागपूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद (BJP State President) मिळाले तर ती व्यक्ती पुढे काय काय होते, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भविष्याची दिशा स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील, असेही त्यावेळी गडकरींनी स्पष्ट केले. मात्र फडणवीस हे जर पुढे दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची (Chief minister)संधी असल्याचे सूतोवाचही यावेळी नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात त्यांनी बावनकुळे यांचे तोंड भरुन कौतक केले. एका ऑटोरिक्षा चालवणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद मिळेपर्यंतचा बावनकुळे यांचा प्रवास हा प्रेरणादायी असल्याचेही गडकरींनी सांगितले. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अत्यंत चांगल्या व्यक्तीची निवड भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी केल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. सामान्य कार्यकर्त्यांचा भाजपा हा पक्ष असून, बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्षपद हे त्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कुठल्याही माता-पुत्रांचा किंवा पिता-पुत्रांचा पक्ष नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवरही अप्रत्यक्ष टीका केली. काही दिवसांपूर्वी जे पी नड्डा यांची भेट झाली होती. त्यावेळीच आपल्याला हे नाव माहित होते, देवेंद्र फडणवीस यांनाही कल्पना होती. मात्र घोषणा होत नाही, तोपर्यंत बोलायचे नाही, ऐनवेळी बदल झाला तर घोळ नको, म्हणून सांगितले नाही, असेही मोकळेपणाने गडकरी यांनी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे गडकरींकडून तोंडभरुन कौतुक

ऊर्जामंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात अत्यंत चांगली कामगिरी केल्याची शाबासकी यावेळी गडकरींनी बावनकुळे यांना दिली. नागपूर आणि विदर्भात काम करताना अनेक कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणी बावनकुळे यांनी सोडवल्या, त्यांचे अनेकांशी चांगले संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. बावनकुळे यांचा सत्कार हा मोठ्या स्टेडियममध्ये व्हायला हवा, असेही त्यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना सूचित केले. विधानसभेचे तिकिट नाकारल्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया न देता, नाराजी व्यक्त न करता त्यांनी ज्या तडफेने काम केले, त्यात त्यांची कार्यकर्ते होण्याच्या परीक्षेत ते पास झाल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रश्नांची मालकी घेण्याची आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची धडाडी बावनकुळे यांच्याकडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

हे अजिबात करु नका, बावनकुळे यांना दिला गडकरींनी सल्ला

घराणेषशाहीवर टीका करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे कानही टोचले. अनेक जणांची तिकिटे मागताना आपल्याला मिळत नसेल तर आपल्या मुलाा, पत्नीला, मेव्हण्याला तिकिचट मागण्याची वृत्ती असते, अशी तिकिटे अजिबात देऊ नका, असा सल्लाच गडकरी यांनी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला. राजकीय घरातील मुलाला राजकारणात यावे असे वाटणे गैर नाही, मात्र त्याचे तिकिट त्याच्या आई-वडिलांनी मागू नये तर जनतेतून त्याला तिकिट द्या, अशी मागणी व्हायला हवी, असे सांगत गडकरींनी भाजपाची याबाबतची भूमिकाच स्पष्ट केली.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.