मुंबईत 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ऑपरेशन ‘ऑल आऊट’; रस्त्यावर उतरत केली वाहनांची तपासणी

थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत ऑपरेशन ऑल आऊटला सुरुवात केली आहे. या अंतर्गंत रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी  नाकाबंदी करून वाहनांची तपासणी देखील करण्यात येत आहे.

मुंबईत 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ऑपरेशन 'ऑल आऊट'; रस्त्यावर उतरत केली वाहनांची तपासणी
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 7:26 AM

मुंबई : थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत ऑपरेशन ऑल आऊटला सुरुवात केली आहे. या अंतर्गंत रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी  नाकाबंदी करून वाहनांची तपासणी देखील करण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम मोडणारे व कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मध्यरात्री पोलिसांकडून वाहनांची तपासणी 

थर्टी फस्ट अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वांनाच उत्सुकता असते. मात्र या काळात  दरवर्षी मद्यपान करून गाडी चालवल्याने किंवा अन्य कारणाने असंख्य घातपात, अपघात होत असतात. हे टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी रस्त्यावर उतरत वाहनांची चेकिंग केली. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आणि प्रवासात मास्कचा वापर न करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर काही घातपात होऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे.

ओमिक्रॉनची धास्ती

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र त्यानंतर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतामध्ये देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेमध्ये याच्या प्रादुर्भावाचा वेग अधिक आहे, त्यामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. असे होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात असून, नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

स्वस्त धान्याचा काळा बाजार; मुंबईत गोदामावर छापा, 25 लाखांचा धान्यसाठा जप्त

Nagpur | एम्सच्या संचालकांची बनावट इंस्टाग्राम आयडी!, सायबर गुन्हेगारानं लढवली शक्कल, वाचा काय आहे प्रकरण?

Hariyana : मालिकेत काम मिळवून देतो सांगत आधी मैत्री केली, नंतर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.