Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्यकर्त्यांकडून पैसे गोळा करणे सुरू… पंकजा मुंडे यांनी हात जोडले; भावनिक आवाहन करत म्हणाल्या…

श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला होता. तसं तुम्ही करंगळी लावून माझा कर्जाचा डोंगर उचलण्याचा प्रण केलाय हीच माझ्यासाठी मोठी शक्ती आहे. प्रत्यक्षात मी ती रक्कम माझ्या अकाऊंटमध्ये जमा करणार नाही, असं आवाहन पंकजा मुंडे म्हणाल्या.

कार्यकर्त्यांकडून पैसे गोळा करणे सुरू... पंकजा मुंडे यांनी हात जोडले; भावनिक आवाहन करत म्हणाल्या...
pankaja munde Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 8:57 AM

मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या कारखान्याला जीएसटी विभागाने नोटीस (gst notice) बजावली आहे. साखर कारखान्याला (sugar factory in Beed) रक्कम भरण्याचे आदेश या नोटिशीतून देण्यात आले आहेत. पंकजा मुंडे या आर्थिक विवंचनेत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावागावातून पैसा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा मुंडे यांच्यावरचं कर्जाचं डोंगर दूर करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काहींनी तर त्यांना चेकही पाठवले आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे भारावून गेल्या आहेत. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करून कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच मला आर्थिक मदत करू नका. तुमचं प्रेम राहू द्या, असं आवाहन पंकजा यांनी हातजोडून केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी फेसबुक आणि ट्विटरवर हा भावनिक आवाहन करणारा व्हिडीओ ट्विट केला आहे. गेले काही दिवस मी एका विषयाचा विचार करत होते. तुमच्याशी आज बोलत आहे. माझ्या कारखान्याचा विषय आहे. त्यावर प्रत्येकाने आपआपल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण मला जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मला वाटतं जीवनातील ही फार मोठी शक्ती माझ्या पाठी उभी आहे. शिवशक्ती परिक्रमा यशस्वी झाली. त्याची पाठीवर थाप पडते न पडते तोच हा प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

अनेक प्रसंग जीवनात…

माझ्या जीवनात असे प्रसंग सतत येत आहेत. त्यामुळे उभं राहण्याची मलाही सवय करून घेतली पाहिजे. आणि तुम्हालाही. पण प्रत्येक प्रसंगातून आपला एकमेकांवरचा जीव घट्ट होत आहे. आपण सर्व एकजीव होत आहोत ही फार मोठी गोष्ट आहे. अशा अडचणी दुष्काळीभागात अनेक कुटुंबात येत असतात. त्यांना त्याला सामोरे जावं लागत आहे. आपल्याला थोडसं अधिकचं जावं लागलतंय. सर्व विषय आपल्या बाजूने असतानाही आपल्याला त्यातून जावं लागत आहे. त्यातूनच या तुमच्या भावना निर्माण समोर येत आहेत, असं त्या म्हणाल्या.

वकिलांचा सल्ला घेतेय

गोपीनाथ मुंडे यांनी तुमच्यात स्वाभिमानाचं बीजारोपण केलं आहे. त्यामुळे तुम्ही एकत्र आलात आणि पंकजाताईंचा जीएसटी भरण्याचं ठरवलं. पण असं करण्याची गरज नाही. या प्रकरणात नियमाने काय कारवाई करायची आहे? काय अपील करायचे आहे? काय पावलं उचलायची आहेत? बँकांचे काही विषय आहेत. याबाबत योग्य तो सल्ला घेत आहे. वकिलांचा सल्लाही घेत आहे. सीएंचा सल्ला घेत आहे. मी योग्य ते पाऊल उचलत आहे. परिस्थिती आपल्यासाठी अयोग्य असली तरी आपली पावलं योग्य दिशेने जावीत हा माझा प्रयत्न आहे, असं पंकजा यांनी सांगितलं.

पैसे गोळा करू नका

तुम्ही सर्व जे पैसे एकत्र करत आहात ते आकडे पाहून मला भोवळ आलीय. आपलं सर्व किडूक मिडूक एकत्र करून संसार करणारे आपण. अशा परिस्थितीत ताईंसाठी तुम्ही जे आकडे गोळा करत आहात ते बघून समाधान वाटलं. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अशा कोणत्याही रकमा जमा करू नये. कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मला या कारणासाठी करू नये.

हा विषय मी माझ्या पद्धतीने मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. मला फक्त या संकाटातून बाहेर पडण्याचा आशीर्वाद द्या. तुमचे आशीर्वाद हीच मोठी शक्ती माझ्या पाठी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तुमचं प्रेम माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील अकाऊंटमध्ये जमा करा. तेच आवश्यक आहे. तुमच्याकडून रक्कम घेणं मला पटत नाही. माझा स्वाभिमान मला ते करू देत नाही. त्यामुळे त्या रकमा घरी ठेवा आणि प्रेम माझ्या अकाऊंटमध्ये जमा करा, असं आवाहन त्यांनी केलंय.

आई कधीच लेकराच्या…

मुलीच्या लग्नाचा चेक, शिक्षणासाठीचे पैसे आणि व्यवसायासाठी जमवलेला पैसा मला पाठवण्याची गरज नाही. तुम्ही चेक करून पाठवत आहात. तुमच्या मोठमोठ्या रकमा माझ्यापर्यंत आल्या आहेत. सहा ते सात कोटींची रक्कम दोन दिवसात जमा झाली आहे. तुम्ही 20 नव्हे 40 कोटीही जमा कराल याचा मला विश्वास आहे. पण ते घेणं मला शोभत नाही. मी तुम्हाला देण्याच्या भूमिकेत आहे. कितीही टीका झाली तरी आई लेकराच्या ताटातील खात नसते. कितीही टीका केली तरी मी तुमच्या आईच्याच भूमिकेत आहे. तुमच्या तोंडचा घास मी कधीच खाणार नाही. यातून मार्ग काढेल. यातून बाहेर पडू असा विश्वास मला आहे, असं भावनिक उद्गारही त्यांनी काढलंय.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.