‘सर्वोच्च न्यायालयाचा आदर, न्यायालयाच्या आदेशानुसारच तपासासाठी हजर’, 7 तासाच्या चौकशीनंतर परमबीर सिंहांची प्रतिक्रिया
किला कोर्टाने फरार म्हणून घोषित केल्यानंतर अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज सकाळी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांची गोरेगावातील वसुली प्रकरणाविषयी चौकशी करण्यात आली. तब्बल 7 तास चाललेल्या चौकशीनंतर परमबीर सिंह सिंह यांना सोडण्यात आलं आहे.
मुंबई : किला कोर्टाने फरार म्हणून घोषित केल्यानंतर अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)आज सकाळी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर कांदिवली गुन्हे शाखा (Kandiwali Crime Branch) युनिट 11 च्या कार्यालयात त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांची गोरेगावातील वसुली प्रकरणाविषयी (Ransom Case) चौकशी करण्यात आली. तब्बल 7 तास चाललेल्या चौकशीनंतर परमबीर सिंह सिंह यांना सोडण्यात आलं आहे. उद्या पुन्हा एखदा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.
बिमल अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाने परमवीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात करोडोंची वसुली केल्याची तक्रार दाखल केली होती. या आरोपानंतर सिंग यांच्यामागे आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आज तब्बल सात तास चौकशी झाल्यानंतर तपासात जे सहकार्य करायचे होते ते आम्ही केले आहे आणि करत राहू, अशी प्रतिक्रिया सिंह यांच्या वकिलांनी दिली.
परमबीर सिंह यांची पहिली प्रतिक्रिया
तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी आज तपासासाठी हजर झालो आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मला आदर आहे. जसा कोर्टाचा आदेश आहे त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया परमबीर सिंह यांनी दिली आहे. याशिवाय आपल्याला काही बोलायचं नसल्याचं सिंह म्हणाले.
सिंहांनी सर्व आरोप फेटाळले
गुन्हे शाखेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाझे आणि विमल अग्रवाल यांच्यात काय झाले, याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. सचिन वाझे यांनी आजवर आमच्या नावावर जे काही जमा केले आहे, त्याची आम्हाला अजिबात माहिती नव्हती. आमच्यावर जे काही आरोप झाले त्यात तथ्य नाही, आम्ही कोणाकडे पैसे मागितले नाहीत,” असे सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सांगितले आहे.
फरार घोषित केल्यानंतर चौकशीसाठी हजर
दरम्यान, अनेक वेळा चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी सिंह यांना फरार म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर किला कोर्टाने सिंह यांना फरार घोषित केलं होतं. तसेच आगामी 30 दिवसांच्या आत हजर न झाल्यास संपत्ती जप्ती करण्याची कारवाई करण्यात येईल अशी तंबीदेखील कोर्टाने दिली होती. त्यानंतर आता सिंह मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले.
इतर बातम्या :