बेशुद्ध पडलेल्या रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले, राजावाडी पालिका रुग्णालयातील गंभीर प्रकार

मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एका रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे.

बेशुद्ध पडलेल्या रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले, राजावाडी पालिका रुग्णालयातील गंभीर प्रकार
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 7:03 PM

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एका रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. श्वास घेताना दम लागत असल्यामुळे या तरुणाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा तरुण अतिदक्षता विभागात बेशुद्धावस्थेत असताना हा प्रकार घडला. (patient attacked by rats in Mumbai Rajawadi Municipal Corporation hospital management said will take care next time)

मेंदूज्वर झाल्याने तरुण रुग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार श्रीनिवास यलप्पा या तरुणाला श्वास घेताना दम लागत होता. नंतर त्रास असह्य झाल्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या तरुणाला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले. या बाबतचे उपचार घेत असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांना या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. नंतर नातेवाईकांनी तपासले असता तरुणाच्या डोळ्यांना उंदराने कुरतडले असल्याचे समजले.

नर्सकडून कुटुंबीयांना उद्धटपणे उत्तरे

हा प्रकार समजल्यानतर तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील नर्सना विचारले असता नर्सने त्यांना उद्धटपणे उत्तरे दिली. तसा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. नंतर हा प्रकार सार्वजनिक झाल्यानंतर राजावाडी येथील मनपा रुग्णालय प्रशासनावर सर्वत्र टीका झाली. तसेच परिसरात मोठी खळबळ माजली. या प्रकारामुळे रुग्णालयात ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तेसुद्धा काही काळ चिंतेत पडले.

सुरक्षेचे उपाय करीत आहोत

दरम्यान, ज्या आयसीयू रूममध्ये ही घटना घडली त्या तळमजल्यावर उंदरांचा वावर आहे. श्रीनिवास यांना उंदराने चावा घेतला असल्याचे दिसते आहे. याबाबत सुरक्षेचे उपाय करीत आहोत, असे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या :

कोरोनामुक्त गावात दहावी- बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

Maratha Reservation : काही लोक ट्विटरवरून माहिती देत आहेत. हे काय गौडबंगाल? विनायक मेटेंचा सवाल

पंकजा मुंडे, वडेट्टीवार म्हणाले, निवडणुका होऊ देणार नाही, आता 5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर

(patient attacked by rats in Mumbai Rajawadi Municipal Corporation hospital management said will take care next time)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.