India Alliance Protest | मुंबईत तणाव वाढला, पोलीस आणि आंदोलक आमनेसामने, नेमकं काय घडतंय?

इंडिया आघाडीकडून मुंबईत गांधी जयंतीच्या निमित्ताने पदयात्रा काढण्यात आली आहे. मैं भी गाधी असं नाव या पदयात्रेला देण्यात आलं आहे. या पदयात्रेत इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आले आहेत.

India Alliance Protest | मुंबईत तणाव वाढला, पोलीस आणि आंदोलक आमनेसामने, नेमकं काय घडतंय?
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 3:30 PM

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : इंडिया आघाडीकडून मुंबईत महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने पदयात्रा काढण्यात आली आहे. ‘मैं भी गांधी’ असं नाव या पदयात्रेला देण्यात आलं आहे. या पदयात्रेत इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आले आहेत. शेकडो कार्यकर्त्यांचा मोठा जमाव या पदयात्रेच्या निमित्ताने रस्त्यावर उतरला आहे. दुसरीकडे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झालीय. पण कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात धुमश्चक्री बघायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय.

मुंबईच्या मेट्रो सिनेमापासून पुढे कार्यकर्ते पदयात्रेसाठी चालायला लागले. फॅशन स्ट्रीटजवळ सर्व कार्यकर्ते पोहोचले. पोलीस इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत बोलण्याचे प्रयत्न करत आहेत. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. पोलीस कार्यकर्ते आणि नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकरली होती. पण तरीसुद्धा हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते जमा झाले आहेत. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यासह अनेक नेते या रॅलीत सहभागी झाले.

गांधीजींचा पुतळा रस्त्यावर ठेवून भजन सुरु

या सगळ्या गदारोळादरम्यान रस्त्यातच महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला. त्यानंतर ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन सुरु करण्यात आलं. यावेळी वर्षा गायकवाड या देखील कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर बसल्या आहेत. काँग्रेस नेत्या विद्या चव्हाण या देखील इथे आहेत. त्यांच्यासह अनेक दिग्गज नेते या रॅलीत आहेत. ही रॅली सुरुवातीला मंत्रालयाच्या दिशेला निघाली होती. यावेळी पोलिसांनी रॅली अडवली.

“राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या पदयात्रेआधीच पोलिसांनी दंडेलशाही सुरू केली असून आम आदमी पक्षाच्या १०० कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. पूर्णपणे शांततेने होणार असलेल्या या कार्यक्रमाला कोणत्याही कारणाविना मज्जाव करण्यात येत असून हा सगळा प्रकार ब्रिटिशराजची आठवण करून देणारा आहे”, अशी भावना मुंबई कॅांग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.

“ब्रिटिशांच्या क्रूर आणि अन्यायकारक राजवटीत बापूंच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची अशीच धरपकड व्हायची. आज स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शांततापूर्व पदयात्रेतही पोलिसांची दंडेलशाही सुरू आहे. हे नेमकं कोणाचं राज्य सुरू आहे, भारतात लोकशाही असताना शांततेच्या मार्गाने होणाऱ्या पदयात्रेत दंडेलशाही करण्याचा आदेश पोलिसांना कोणी दिला?”, असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.

“सरकारची ही कारवाई ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीची आठवण करून देणारीच आहे. या उन्मत्त सरकारला आम्ही गांधीजींच्या मार्गानेच विरोध करू”, असंही वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.