आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप, दिशा सालियनच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ, नेमकं कारण काय?
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची दिवंगत माजी मॅनेजर दिशा सालियनच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आलीय.
कृष्णा सोनारवाडकर, मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून विधानसभेत मांडण्यात आला. भाजपचे आमदार अमित साटम यांनी एसआयटीच्या मार्फत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी भाजप पक्षाच्या अनेक आमदारांनी, महिला आमदारांनी ही मागणी उचलून धरली. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी भाजप आमदाराची असलेली मागणी मान्य करत संबंधित प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आलीय.
दिशा सालियनच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आलीय. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर आज विधानसभेत मुद्दा आला. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांना प्रसारमाध्यमांना भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज सत्तांधाऱ्यांनी अनके प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर दिशा सालियनच्या नायगाव येथील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील दोन ते तीन पोलीस कर्मचारी दिशाच्या घराबाहेर बंदोबस्ताला आहेत.
दिशाचे आई-वडील प्रसारमाध्यमांसमोर येऊ नये याची काळजी घेतली जात आहे. तसेच दिशाच्या आई-वडिलांना माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, अशी सूचना देण्यात आलीय.