Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतून देणार महाराष्ट्राला वंदे भारत ट्रेन, भाडे, वेळापत्रक अन् थांबे

Mumbai-Jalna Vande Bharat Express timing | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अयोध्यातून महाराष्ट्राला वंदे भारत ट्रेन भेट देणार आहे. महाराष्ट्राला मिळणारी ही सहावी ट्रेन आहे. महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर सुरु झाली होती. त्यानंतर आता मुंबई ते जालना ही ट्रेन सुरु होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतून देणार महाराष्ट्राला वंदे भारत ट्रेन, भाडे, वेळापत्रक अन् थांबे
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 12:21 PM

अयोध्या, मुंबई, दि. 30 डिसेंबर 2023 | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अयोध्या दौरा होणार आहेत. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात अयोध्या धाम रेल्वे स्टेशन आणि अयोध्या एअरपोर्टच्या उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या एकदिवसीय दौऱ्यात अयोध्येला 15 हजार 700 कोटी रुपयांच्या योजनांची भेट मिळणार आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात देशाला सहा वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. त्यात महाराष्ट्रातील एक वंदे भारत ट्रेन आहे. पंतप्रधान दोन अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेकत. महाराष्ट्रातून मुंबई आणि जालना वंदे भारत ट्रेन सुरु होत आहे. राज्यातून सुरु होणारी ही सहावी वंदे भारत ट्रेन आहे. मुंबई जालना ट्रेन एक जानेवारीपासून तर दोन जानेवारीपासून जालना मुंबई ट्रेन सुरु होणार आहे.

कसे असणार वंदे भारतचे शेड्यूल

महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपूर या पाच मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई ते जालना या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहे. मुंबई ते जालना वंदे भारत रेल्वे बुधवार वगळता सहा दिवस धावणार आहे. यामुळे मराठवाड्यातून मुंबईला येण्यासाठी कमी कालावधी लागणार आहे. ट्रायल रनमध्ये शंभर किलोमीटर वेगाने ही रेल्वे धावली होती.

कोणत्या स्थानकावर थांबणार

वंदे भारत ट्रेन मुंबईवरुन छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिनरवरुन सुटणार आहे. त्यानंतर दादार, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्टेशनवर थांबणार आहे. नाशिक, मनमाडला ही दुसरी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. यापूर्वी धावणारी मुंबई-शिर्डी ट्रेन या मार्गावरुन जात आहे.

हे सुद्धा वाचा

वंदे भारत ट्रेनच्या वेळा काय

वंदे भारत ट्रेन मुंबईवरुन दुपारी 1:10 वाजता सुटणार आहे. ती जालन्याला रात्री 8:30 वाजता पोहचणार आहे. तसेच जालन्यावरुन ही ट्रेन सकाळी 5:05 वाजता सुटणार आहे. मुंबईला ही ट्रेन सकाळी 11:55 वाजता पोहचणार आहे. या ट्रेनमध्ये अद्यावत सुविधा देण्यात आली आहे. ट्रेनमध्ये ऑनबोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस-आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटीरियर्स, टच-फ्री सुविधांसह बायो-व्हॅक्यूम टॉयलेट, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक टच-आधारित रीडिंग लाइट्स दिले आहेत. ट्रेनमधील अतिनील आहेत. वेंटिलेशन आणि वातानुकूलित यंत्रणा उत्तम असेल. इंटेलिजेंट एअर कंडिशनिंग सिस्टीम हवामान परिस्थिती/व्यवसायानुसार कूलिंग समायोजित करते.

काय आहे तिकीट दर

  • जालना-मुंबई ₹1120
  • जालना मुंबई एक्झीकेटीव्ह चेअर कार ₹2125
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.