पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणासीतून जिंकणं कठिणच, मुकाबला कुणाशी होणार?; संजय राऊत यांनी घेतलं बड्या नेत्याचं नाव

एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे संसदेतील भाषा ही भाजपच्या नव्या संस्कृतीला शोभणारे होते. हेच लोक आता भाजपच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार आहेत, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणासीतून जिंकणं कठिणच, मुकाबला कुणाशी होणार?; संजय राऊत यांनी घेतलं बड्या नेत्याचं नाव
pm narendra modi Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 8:00 AM

मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणासीतून जिंकणं कठिण जाणार असल्याचं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी वाराणासीतून निवडणूक लढवावी अशी सर्वांची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासी आणि गुजरातमधून लढतील. पण त्यांना वाराणासीतून प्रियंका गांधी यांच्या विरोधात निवडणूक जिंकणं तितकं सोपं राहणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी मोदींविरोधात प्रियंका गांधी लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रियंका गांधींविरुद्ध नरेंद्र मोदी असा सामना पाहायला मिळणार आहे.

खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोकमधून हे विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच रोखठोकमधून राऊत यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार निशाना साधला आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही हल्ला चढवला आहे. केंद्रातील मंत्री नारायण राणे यांनी अविश्वास ठरावाच्यावेळी लोकसभेत भाषण केलं. मोदींना राणेंचे हे भाषण ऐकायला हवे होते. महाराष्ट्राच्या उदात्त संस्कृतीची लाज घालवणारे राणेंचे ते भाषण होते, अशी टीका संजय राऊत यांनी रोखठोकमधून केली आहे.

हे सुद्धा वाचा

श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्ला

एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे संसदेतील भाषा ही भाजपच्या नव्या संस्कृतीला शोभणारे होते. हेच लोक आता भाजपच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार आहेत, असा दावाही राऊत यांनी केला आहे. तसेच 2023च्या लोकसभेतील विजयासाठी मोदी आणि शाह यांना दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात. भ्रष्टाचाऱ्यांची मोट बांधून त्यांची वारेमाप स्तुती करावी लागते. हाच त्यांचा पराभव आहे. येत्या 2024मधील पराभवाची ही सुरुवात आहे, असा दावाही रोखठोकमधून करण्यात आला आहे.

देश परिवर्तनाच्या दिशेने

मोदींना इतिहास घडवण्याची संधी नियतीने दिली आहे. पण मोदींना काहीच घडवता आले नाही. त्यांनी नाही म्हणायला नवे संसद उभारले. पण ते सुरू होण्याआधीच गळू लागले आहे, अशी टीका करतानाच ज्या संसद भवनातून भारत छोडो आंदोलनाच्या स्वातंत्र्यांची पहाट उगवली, तेच संसद भवन मोदींना नकोसे झाले आहे. तरीही भारत छोडेचे नारे आपल्या विरोधकांविरुद्ध देताना त्याच ऐतिहासिक संसदेने पाहिले आहे. आता देश परिवर्तनाच्या दिशेने निघाला आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.