Eknath Shinde Breaking: हिंदुत्ववादी शिवसेनेकडे 40आमदार आहेत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा, आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा

पण शिवसेनेतून फुटलेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत आहोत. त्याच विचाराने आम्ही एकत्र आलो असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Eknath Shinde Breaking: हिंदुत्ववादी शिवसेनेकडे 40आमदार आहेत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा, आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा
एकनाथ शिंदे Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 10:06 PM

सूरत – आपल्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे 40आमदार (Shivsena 40 MLA)आहेत, असा दावा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी सूरतमूधन केला आहे. टीव्ही-9शी त्यांनी काही वेळापूर्वी त्यांनी संभाषण साधले. त्यात त्यांनी आपल्यासोबत 40आमदार असल्याचा दावा केला आहे. यात यामिनी जाधव, लता सोनावणे, गीता जैन यांच्यासारखे आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. हे सगळे आमदार सूरतच्या (Surat)ली मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आपण शिवसेनेतून फुटलेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत आहोत. त्याच विचाराने आम्ही एकत्र आलो असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे पुन्हा शिवसेनेत परततील का, या प्रश्नाचे उत्तर मात्र या संभाषणात मिळालेले नाही.

संजय राऊत यांचा सूरतमधील आमदारांना इशारा

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना आम्ही प्रेमाने परत बोलवले आहे, त्यांनी प्रेमाने परत यावे. पण त्यांनी जर नियम मोडला तर त्यांची आमदारकी रद्द होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. त्यांना पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागेल. त्यांचे राजकीय कारकीर्द संपेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे. भाजपाच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती खाती होती, याची आठवणही राऊतांनी करुन दिली आहे. भाजपासोबत सरकार स्हाथापन करणे हा  केवळ एक बहाणा असल्याचेही राऊत म्हणाले आहेत.

ली मेरिडियन हॉटेलमध्ये भाजपाचे आमदार मोहित कंबोज

दरम्यान सूरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये शिवसेना णदारंसोबत काही भाजपाचे आमदार, नेतेही उपस्थित असल्याची माहिती आहे. याची काही छायाचित्रही बाहेर आली आहेत.य भाजपाचे आमदार मोहित कंबोज हे सूरतमध्ये या हॉटेलमध्ये उपस्थित असल्याचे या छायाचित्रात दिसते आहे. भाजपा नेते रावसाहेब दानवे हेही सूरतमध्ये गेल्याची माहिती आहे. त्याचबरोबर इतरही काही भाजपाचे आमदार सूरतमध्ये गेल्याची माहिती आहे. दरम्यान या ठिकाणी असलेल्या आमदारांपैकी एक आमदार नितीन देशमुख यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना सूरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नितीन देशमुख यांच्या पत्नीही रात्री उशिरा तिथे पोहचल्या आहेत. देशमुख यांना उपचारानंतर पुन्हा ली मेरिडियन हॉटेलमध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. रात्री उशिरा या हॉटेलमधून शिवसेना आमदारांना दुसरीकडे नेण्यात येईल, असे सांगण्यात येते आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत असलेल्या शिवसेनेचे आमदारही सेंट रेगीस हॉटेलमध्ये

आता मुंबईत उरलेल्या शिवसेना आमदारांनी फुटू नयेत, म्हणून या आमदारांना सेंट रेगिस या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. या सगळ्या आमदारांची जबाबदारी युवा सेनेकडे देण्यात आली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही या सगळ्या काळात या आमदारांसोबतच राहणार आहेत. याच आमदारांसोबत जेवण घएणार असल्याचीही माहिती आहे. हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.