कधी कुणाच्या मयताला तरी आला का?, संजय राऊत राजीनामा द्या; कुणी केली मागणी?

सुनील बाळा कदम हा राऊत साहेबांचे दौरे बघायचा. तेव्हा राऊत साहेब महापौर बंगल्यावर बसून डील करायचे. वरळीच्या हिल टॉप हॉटेलमध्ये कुठला कारकून काम करत होता? त्याचे सीसीटीव्ही फुटेज पब्लिकमध्ये आणा. तो कारकून कोणाला भेटलेला हे त्यातून समजेल. पक्षाची वाताहत झालेली आहे हेचं कारण आहे. आम्ही जर चुकीचं काम करत होतो तर कोरोना काळात आदित्य ठाकरे आम्हाला ट्विट करून, टॅग करून कशाला कामाचे वाटप करायचे? असा सवाल राहुल कणाल आणि अमेय घोले यांनी केला आहे.

कधी कुणाच्या मयताला तरी आला का?, संजय राऊत राजीनामा द्या; कुणी केली मागणी?
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 1:33 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही9 प्रतिनिधी, मुंबई | 31 जानेवारी 2024 : खिचडी घोटाळ्यावरून मुंबईचं राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर खिचडी घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर हा मुद्दा अधिकच तापला आहे. शिंदे गटाचे नेते राहुल कणाल यांनी तर थेट राऊत यांना आव्हानच दिलं आहे. आमच्यावरील आरोप सिद्ध करा. आम्ही खिचडी घोटाळ्यात असल्याचं सिद्ध करा, नाही तर खासदारकीचा राजीनामा द्या, असं आव्हानच राहुल कणाल यांनी दिलं आहे. तर, आमच्यावरील आरोप सिद्ध केल्यास आम्ही राजकारणाचा त्याग करू. आरोप सिद्ध न झाल्यास संजय राऊत राजकारण सोडणार काय? असा सवाल अमेय घोले यांनी केला आहे.

शिंदे गटाचे नेते राहुल कणाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो कोणत्याही घोटाळ्यात आमचं नाव आलं असेल किंवा कोणतीही कंपनी आमची असेल तर कारवाई करा. तुम्हाला माहिती हवी असेल तर आरटीआयमधून माहिती काढा. आमचं नाव आलं तर आम्ही राजकारण सोडायला तयार आहोत. तुम्हीही बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा. तुम्हीही आमच्यावरील आरोप सिद्ध करा. आरोप सिद्ध नाही केले तर तुम्ही राजीनामा देणार का? तुम्ही राज्यसभेतून राजीनामा देणार का?, असा सवाल राहुल कणाल यांनी केला.

तेव्हा कणाल चांगला होता का?

तुम्ही कुठे कुठे खिचडी खाण्यासाठी जाता हे सर्वांना माहीत आहे. मी कोव्हिडमध्ये काम केलं. त्याबद्दल तुमच्या नेत्यांनीच माझा सत्कार केला. कोव्हिड काळात तुम्ही आमचे फोटो का लावले? वांद्रे येतील व्हॅक्सीनेशन सेंटरला तुम्ही का आला होता? तुम्ही माझ्या लग्नाला कसे आला? तेव्हा राहुल कनाल चांगला होता, आता नाही का?, असे सवालही त्यांनी केले.

बसा समोरासमोर

आम्ही एक लाख रेशन किट्सचं वाटप केलं. राहुल कनाल 24 तास काम करत होता हे तुमच्या नेत्याने सांगितलं होतं. वरळीत पहिली रुग्णवाहिका मी दिली. वरळीत रेशन आम्ही दिलं. आम्ही औषधे दिले. तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवला का? कोव्हिड काळात कधी कुणाच्या मयताला स्मशानात गेला का? असे सवाल करतानाच ओपन डिबेट करा. आम्ही पुरावे घेऊन येतो. बसा समोरासमोर. नाही तर राजीनामा द्या, असं आव्हानच त्यांनी दिलं. माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. पुराव्या अभावी मी बोलत नाही. तुम्ही राजकारणी असण्यापूर्वी स्वतः पत्रकार आहात. त्यामुळे वास्तवावर बोला. पुराव्याशिवाय बडबड करू नका, असा टोलाही कणाल यांनी लगावला.

तर राजकारणाचा त्याग करू

अमेय घोले यांनी ही राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. खिचडी घोटाळ्यात यांच्या लोकांची नावे आली आहेत. ती ऑन रेकॉर्ड आहेत. त्यांचे व्यवहारही समोर आले आहेत. त्यांनी कधीच त्यावर खुलासा केला नाही. पक्ष सोडला तर आम्हाला चोर, खोके सरकार अशी नावे ठेवता. तुम्ही काय आहात? तुम्ही ज्या घोटाळ्याचा आरोप करत आहात, त्यात आमचं नाव असेल तर आम्ही राजकारणाचा त्याग करू, असं विधानच अमेय घोले यांनी केलं.

महापौर बंगल्यावरील सीसीटीव्ही तपासा

आमचे कोव्हिड काळातील कामे सामनातही छापून आलीत. आम्ही काम करत असताना तुम्ही कुठे होता? सुनील बाळा कदम आणि सुजीत पाटकर यांच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाले आहेत. महापौर बंगल्यावरीलही सीसीटीव्ही फुटेज शोधा. कोव्हिड काळात आणि नंतर हे लोक महापौर बंगल्यात का यायचे? राऊत यांचे फोन कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांना जायचे? त्याची माहिती द्या, असं आव्हानच घोले यांनी दिलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.