लोकलने फुकट प्रवास करणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाचा दणका, 71 कोटींचा दंड वसूल
1 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विनातिकीट/अनियमित प्रवाशांची एकूण 12.47 लाख प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून 71.25 कोटींची रक्कम वसूल करण्यात आली. सर्व झोनल रेल्वेमध्ये दंडाच्या बाबतीत हे सर्वाधिक आहे.
हिरा ढाकणे, मुंबई : मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे. याअंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर -2021 पर्यंत 71.25 कोटी रुपयांचे महसुली नुकसान वाचवून अनियमित प्रवासाची 12.47 लाख प्रकरणे शोधण्यात आलीये.
1 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विनातिकीट/अनियमित प्रवाशांची एकूण 12.47 लाख प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून 71.25 कोटींची रक्कम वसूल करण्यात आली. सर्व झोनल रेल्वेमध्ये दंडाच्या बाबतीत हे सर्वाधिक आहे.
17 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत, तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकांनी कोविड-19 योग्य वर्तनाचे पालन न केल्याच्या एकूण 25,610 प्रकरणांचा शोध घेऊन दंड आकारला आहे.
59 लाख 94 हजार रुपये दंड म्हणून वसूल
मास्क न घालणाऱ्या प्रवाशांची एकूण 20,570 प्रकरणे आणि कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवासाला परवानगी नसतानाही प्रवास करणारी 5,040 प्रकरणे आढळून आली आणि अनुक्रमे 34.74 लाख आणि 25.20 लाख म्हणजेच एकून 59 लाख 94 हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले.
मध्य रेल्वेने बोनफाईड रेल्वे वापरकर्त्यांना चांगल्या सेवा पुरवण्याच्या आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्याच्या प्रयत्नात नियमितपणे विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरोधात तीव्र मोहिमा राबवल्या आहेत.
उपनगरी आणि गैर-उपनगरीय / मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सखोल आणि नियमित तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते जेणेकरून सरकारी मार्गदर्शनांनुसार आणि कोविड 19 प्रोटोकॉलचे पालन करून केवळ बोनाफाईड प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करतील. हे देखील उल्लेखनीय आहे की, आपली कर्तव्ये पार पाडताना, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी अत्यंत सौजन्याने आणि चांगल्या वर्तनाचे प्रदर्शन केले ज्यामुळे तक्रारी कमी झाल्या. त्यांनी असंख्य प्रसंगी हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांसोबत एकत्र करून त्यांचे मानवी दृष्टिकोन दाखवून दिले आहे.
गैरसोय टाळण्यासाठी, सन्मानाने प्रवास करण्यासाठी आणि कोविड -19 साठी अनिवार्य असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वे, प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केलं आहे.
मुंबईत लवकरच धावणार हायब्रिड लोकल, जाणून घ्या नेमका फायदा कोणाला?#hybridlocal #Bullettrainproject #WesternRailway #GeneralManagerAlokConsulhttps://t.co/r2Vfjqdbz1
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 29, 2021
संबंधित बातम्या :
सलग दुसऱ्या दिवशी IRCTC चे शेअर्स कोसळले, गुंतवणूकदारांना 30 हजार कोटींचा फटका!