नवीन संसद भवनावर राज ठाकरे यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, ट्विट करत म्हटलं…
New parliament building inauguration : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सत्ताधारी विरोधक समोरासमोर आले असताना रविवारी उद्घाटन समारंभ पार पाडला. हा कार्यक्रम झाल्यानंतर नवीन संसद भवनासंदर्भात राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आलीय.
नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी झाले. या समारंभात १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याची सुरुवात केली होती. त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाला विरोध केला. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले पाहिजे, असे ट्विट केले. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. मग राहुल गांधी यांच्यासोबत देशातील १९ पक्ष आले. परंतु सरकारच्या समर्थनार्थ २५ पक्ष आले आहे. या सर्व राजकीय चर्चांचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्याप समोर आली नव्हती. आता राज ठाकरे यांनी ट्विट करत मनसेची भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे
राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो.
आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं…
— Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2023
किती जणांचा पाठिंबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. या समारंभास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवले नाही. यामुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसह 19 पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात संयुक्त निवेदनही काढले आहे. परंतु आता सरकारच्या समर्थनार्थ 25 पक्ष आले आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये फुट पडली आहे. हे सर्व पक्ष उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहे. यामध्ये एनडीएमधील पक्षांसोबत इतर पक्षही आहेत.
हे ही वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन अन् शाहरुख खान, अक्षयकुमार, अनुपम खेर आले पुढे…
862 कोटी रुपयांचा खर्च झालेला नवीन संसद भवन तयार, कोण आहे आर्किटेक्ट बिमल पटेल