‘एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री जी काही फिरवली कांडी, आणि…’, उद्धव ठाकरे यांची नक्कल करत राज ठाकरे यांचा घणाघात

"एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री जी काही फिरवली कांडी,आता फिरताहेत सगळीकडे", असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

'एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री जी काही फिरवली कांडी, आणि...', उद्धव ठाकरे यांची नक्कल करत राज ठाकरे यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 7:46 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नेस्को सेंटर येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची नक्कल देखील केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आजारी असल्याचं सांगायचे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंची नक्कल केली. स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी मिळेल तो हा हातात घेतला आणि नंतर ते कोपऱ्यात जाऊन बसले, असा घणाघात राज ठाकरेंनी यावेळी केला.

“काल-परवा मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्रीपदावर असताना बघितलं, तब्येतीचं कारण सांगून (उद्धव ठाकरेंची नक्कल), एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री जी काही फिरवली कांडी,आता फिरताहेत सगळीकडे”, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

“त्यांच्यासारखा वागणाऱ्यातला मी नव्हे. स्वत:च्या स्वार्थासाठी आणि पैशांसाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि मागे कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी करत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

“ही लोकं करणार काहीच नाही, मराठीच्या मुद्द्यावर असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल, उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का? त्याचं कारण कधीच भूमिका घेतली नाही. भूमिका घ्यायचीच नाहीय. फक्त पैशांसाठी, स्वार्थासाठी कधी हा तर कधी तो. पण बस मला सत्तेत बसवा”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

“रझा अकादमीने मुंबई महिला पोलिसांवर हात उचलला तेव्हा कोणतंही काम न करता हिंदुत्व करणं, बसलेले आणि बसणारे कुठे होते? या लोकांना काही देणंघेणंच नाही”, असंदेखील राज ठाकरे या कार्यक्रमात म्हणाले.

यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विविध वादग्रस्त विधानावरुन त्यांच्यावरही निशाणा साधला.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.