AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajesh Tope : आरोग्य भरतीवरुन प्रविण दरेकर, पडळकर आक्रमक, गट ड ची परीक्षा एक पैसाही न घेता पुन्हा घेणार, राजेश टोपेंची मोठी घोषणा

कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं. या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं, असं राजेश टोपे म्हणाले.

Rajesh Tope : आरोग्य भरतीवरुन प्रविण दरेकर, पडळकर आक्रमक, गट ड ची परीक्षा एक पैसाही न घेता पुन्हा घेणार, राजेश टोपेंची मोठी घोषणा
Rajesh Tope
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 1:42 PM
Share

मुंबई: कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं. या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं. कुंपणानं शेत खालल्याचं समोर आलंय. ते दुरुस्त करणार आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणं चुकीचं नाही. जे लोक या प्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही, असं राजेश टोपे म्हणाले. जे दोषी असतील त्या कोणालाही पाठिशी घालण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही. गट क आणि गट डच्या तपासाचं काम पोलीस करत आहेत. गट क संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आहे. गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या आहेत. पोलीस तपासात बाबी समोर आल्यानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.

आरोग्य भरतीचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत

गट क साठी 15 लाख रुपये आणि गट क साठी 8 लाख रुपयाचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये समोर आहे. अमरावतीमध्ये 200 विद्यार्थ्यांनी पैसे दिले आहेत ही माहिती खरी आहे का? महेश बोटले हे सहसंचालक आहेत, त्यांचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील तर सरकार यासंदर्भात चौकशी करणार का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.

ऑडिओ क्लिपचा तपास सुरु

दलालांची ऑडिओ क्लिप सायबरकडून तपासली जात आहे. तुमच्या सगळ्यांच समाधान करण्याची माझी जबाबदारी आहे.चौकशीत याची पाळंमुळं खोदून काढूया, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करु,असं राजेश टोपे म्हणाले. आरोग्य विभागानं स्वत: एफआयआर केलेला आहे. आमचा हेतू स्वच्छ होता, असं राजेश टोपे म्हणाले.

आयुष्याशी खेळलं जातंय

न्यासाला काम का दिलं, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला. म्हाडा, आरोग्य भरती, टीईटी परीक्षा या संदर्भात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळलं जात आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ चालणार नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले.

न्यासाला काम कसं मिळालं?

निवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करु, असंही राजेश टोपे म्हणाले. न्यासा कंपनी हायकोर्टात गेली होती. त्यानंतर न्यासाचं सिलेक्शन करण्यात आलं. आरोग्य विभागानं पाच लोकांना कळवलं. पाच कंपन्यांकडून डेमो घेतला. आरोग्य आय़ुक्त, सार्वजनिक आरोग्य सचिवांनी परीक्षा घेतली. अॅप्टेकला 71, जीए सॉफ्टवेअर 83 , मेटा आयटेकला 78 आणि न्यासाला 90 ला गुण होते.

गट ड ची परीक्षा पुन्हा घेणार

आपल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यायची का? पात्रता परीक्षा घेऊ किंवा नव्या परीक्षा पद्धतीनं परीक्षा घेतली जाईल. गट ड ची परीक्षा पुन्हा घ्यायची असल्यास पुन्हा एक पैसा न घेताही घेऊ, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.कोणत्याही चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची निवड केली जाणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले.

इतर बातम्या:

Assembly Session | राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा योजनेचा लाभ, अन् मिळाला परतावाही

आरोग्य भरतीमध्ये गट क साठी 15 लाख ते 30 लाखांची डील, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रेटकार्ड

Rajesh Tope said Health Department Group D reexam taken after police investigation

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.