Rakhi Sawant : राखी सावंत हिची आज पोलिसांपासून सुटका, पण उद्या जेल?
शर्लिन चोप्रा प्रकरणात राखी सावंतची (Rakhi Sawant) तब्बल 4 ते 5 तास चौकशी केल्यानंतर आंबोली पोलिसांनी (Amboli Police) तिला घरी जाण्याची परवानगी दिली आहे.
मुंबई : शर्लिन चोप्रा प्रकरणात राखी सावंतची (Rakhi Sawant) तब्बल 4 ते 5 तास चौकशी केल्यानंतर आंबोली पोलिसांनी (Amboli Police) तिला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. राखी सावंतवर अनेक आरोप करत मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sharlin Chopra) आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर आंबोली पोलिसांनी राखी सावंतला आज दुपारी चौकशीसाठी बोलावले. राखीची तब्बल 4 ते 5 तास प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिला सोडून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंत उद्या पुन्हा एकदा पोलीस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवणार आहे.
राखी सावंतला उद्या पुन्हा एकदा आंबोली पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. चौकशी केल्यानंतर ती दोषी आढळल्यास तिला अटक केली जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
शर्लिन चोप्रा कोण आहे?
शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2012 मध्ये तिने ‘प्लेबॉय’ मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याच्या दोन वर्षांनंतर तिचे फोटो समोर आले होते. एमटीव्ही स्पिल्ट्सविलाच्या सहाव्या सिझनचं तिने सूत्रसंचालन केलं. तिने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता.
गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबतचे तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सात महिन्यांपूर्वी लग्न केल्याचं राखीने कबुल केलं होतं. मात्र आदिलने सुरुवातीला हे लग्न स्वीकारण्यात नकार दिला होता. त्यानंतर आता राखीसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे.
राखी सावंत बिग बॉस मराठीत टॉप 5 स्पर्धक
राखी सावंत हिने नुकतंच बिग बॉस मराठीच्या सिझन 3 मध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात राखी टॉप 5 स्पर्धकांमध्ये पाचव्या क्रमांकची स्पर्धक ठरली होती. विशेष म्हणजे तिने या कार्यक्रमात बक्षीस देखील जिंकलं होतं.
बिग बॉस मराठीमध्ये राखीने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं. त्यामुळे तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि ती बिग बॉसच्या अंतिम सामन्यात पोहोचणावरी पाचवी स्पर्धक ठरली होती. राखीने याआधी हिंदी बिग बॉसमध्येही अनेकवेळा सहभाग घेतला होता.