Raut on MIM: खरी जनाब सेना कोण, हे महाराष्ट्राला सांगणार; भाजपचा कट उधळला, राऊतांचा घणाघात
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, एमआयएमकडून आलेली युतीची ऑफर भाजपच्या कटाचा व्यापक भाग आहे. राजकीय शत्रूला बदनाम करायचे हे एक मोठे षडयंत्र आहे. त्यानुसार त्यांनी एमआयएमच्या लोकांना आमच्याविरोधात सोडले आहे. मात्र, शिवसेनेने हा व्यापक कट उधळून लावला आहे.
मुंबईः खरे जनाब सेनावाले कोण आहेत, हे महाराष्ट्रात जाऊन शिवसेना (Shivsena) खासदार सांगणार आहेत. एमआयएमला (MIM) कोण युती मागितली. खरे तर एमआयएम आणि भाजपची हातमिळवणी झाली आहे. भाजपने (BJP) शिवसेनेची बदनामी करा, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा असा आदेश एमआयएमला दिला आहे. हा कट शिवसेनेने उधळून लावला आहे. याविरोधातच आता शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. त्यातून सारा महाराष्ट्र पिंजून काढू आणि खरी जनाब सेना कोण, हे साऱ्यांना सागू, असा इशारा रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. शिवाय एमआयएमसोबतच्या युतीच्या साऱ्या शक्यता त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या भेटीतच जलील यांनी टोपे यांना युतीची ऑफर दिली. त्यावरून सुरू झालेली राजकीय खडाखडी काही केल्या थांबायला तयार नाही. त्यावरून आज सुट्टीच्या दिवशीसुद्ध उभ्या महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत.
शिवसंपर्क अभियान सुरू…
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेना भवनात मुंबई, ठाण्यासह सगळे प्रमुख पदाधिकारी बसलो होतो. यावेळी खासदार होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या 22 मार्चपासून विदर्भ, मराठवाड्यातून शिवसंपर्क मोहीम सुरू करा, असे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी जोरदार मार्गदर्शन केले. आम्ही सगळे खासदार 19 जिल्ह्यात जाणार आहोत. मी स्वतः नागपूरला जात आहे. चार दिवसांत जिल्ह्याचे वातावरण ढलळून काढणार आहोत.
आमच्या हिंदुत्वात भेसळ नाही…
संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. त्यातून उबग, विष, जळफळाट बाहेर पडतोय. शिवसेना कसली जनाब सेना. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोत. आमच्या हिंदुत्वात भेसळ नाही. जे आम्हाला जनाब सेना म्हणतात, त्यांनी आपली कर्तबगारी भूतकाळात तपासावी. काश्मीरमध्ये अतिरेक्यांना पाठिंबा देणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्याही हातमिळवणी करून सरकार स्थापन करणारे कोण आहेत? खरी जनाब सेना कोण, हे सगळ्या महाराष्ट्राला जाऊन सांगू, असा इशारा त्यांनी दिला.
हा तर भाजपचा कट
संजय राऊत म्हणाले की, सरसंघचालक मोहनराव भागवत स्वतः म्हणालेत की, या देशात मुस्लिमांच्या विरोधात भूमिका घेतील, त्यांना हिंदू म्हणता येणार नाही. एमआयएम ला कोण युती मागितली. खरे तर एमआयएम आणि भाजपची हातमिळवणी झाली आहे. भाजपने शिवसेनेची बदनामी करा, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा असा आदेश दिला. मात्र, जो पक्ष औरंगजेबाच्या कबरीसमोर जाऊन नतमस्तक होतो, अशांबरोबर शिवसेना जाणार नाही.
बदनामीचे मोठे षडयंत्र
राऊत म्हणाले की, एमआयएमकडून आलेली युतीची ऑफर भाजपच्या कटाचा व्यापक भाग आहे. राजकीय शत्रूला बदनाम करायचे हे एक मोठे षडयंत्र आहे. त्यानुसार त्यांनी एमआयएमच्या लोकांना आमच्याविरोधात सोडले आहे. मात्र, शिवसेनेने हा व्यापक कट उधळून लावला आहे. आता आमचे खासदार महाराष्ट्रात जाऊन या कटाची पोलखोल करणार आहेत.
इतर बातम्याः