प्रस्ताव ‘मंत्रालया’तून आला की ‘वर्षा’वरून?; पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाच आता या पदावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचं चित्रं आहे. (ravi raja slams shiv sena over opposition leadership)

प्रस्ताव 'मंत्रालया'तून आला की 'वर्षा'वरून?; पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली
रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 3:55 PM

मुंबई: मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाच आता या पदावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचं चित्रं आहे. विरोधी पक्षनेतेपद भाजपला मिळण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असून या निमित्ताने दोन्ही जुने मित्र जवळ येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (ravi raja slams shiv sena over opposition leadership)

काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असून तेव्हापासून काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडत आहेत. आता पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद या वादाला कारणीभूत ठरलं आहे. पालिकेत काँग्रेसला दाबण्यासाठी शिवसेनेने नवी खेळी सुरू केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद भाजपला देण्यास शिवसेना तयार झाली आहे. आमच्यावर दबाव टाकण्यासाठी शिवेसेना ही खेळी खेळत असून दोन्ही जुने मित्र या निमित्ताने एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेतेपद मिळावं म्हणून भाजपने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून कोर्टात त्यांची केस सुरू आहे. पण आता याप्रकरणात सेना भाजपला मदत करण्यास तयार झाली असून सेनेच्या या खेळीला आम्ही बळी पडणार नाही, असं रवी राजा यांनी स्पष्ट केलं.

प्रस्तावांबाबत गौप्यस्फोट

स्थायी समितीत येणाऱ्या प्रस्तावांवरून रवी राजा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. स्थायी समितीत कोणताही प्रस्ताव आला की हा प्रस्ताव वरून आला असं शिवसेना सांगत असते. वरून म्हणजे नेमका कुठून? मंत्रालयातून प्रस्ताव मंजूर करण्याचा आदेश आला की वर्षावरून हे मात्र शिवसेना सांगत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. पालिकेच्या प्रस्तावामध्ये मंत्रालयातूनच हस्तक्षेप होत असल्याचा अप्रत्यक्ष दावाच रवी राजा यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (ravi raja slams shiv sena over opposition leadership)

संबंधित बातम्या:

सातव, केदार, वडेट्टीवार, ठाकूर, पटोले की चव्हाण?; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

नागपूरवाले मला म्यूट का करतात?; मुख्यमंत्र्यांचा सवाल

LIVE | संजय राऊत यांच्या पत्नी ईडी कार्यालयात हजर

(ravi raja slams shiv sena over opposition leadership)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.