Ravi Rana: सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून?; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Ravi Rana: छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि संभाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र. ओवैसी इथे आले आणि कबर उघडून त्यावर फुले वाहिली.

Ravi Rana: सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून?; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून?; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांना सवालImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 3:21 PM

मुंबई: एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin owaisi) यांनी महाराष्ट्रात येऊन औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याने त्यावरून राजकीय पडसाद उमटले आहेत. खुद्द शिवसेनेनेही (shivsena) या मुद्द्यावरून ओवैसींना फटकारले आहे. तर अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्याच्या सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करणार आहे की औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहायला जाणार आहेत? असा सवाल रवी राणा (ravi rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे. हनुमान चालिसा पठण केल्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकले जाते. पण अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये येऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून जातात. आता देशातील प्रत्येक हिंदूचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, उद्धव ठाकरे हनुमान चालिसा वाचणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार? असा सवाल रवी राणा यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि संभाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र. ओवैसी इथे आले आणि कबर उघडून त्यावर फुले वाहिली. माझ्या राजकीय जीवनात त्या कबरीवर कोणी गेल्याचं मी ऐकलं नव्हतं. पण ठाकरे सरकार आल्यानंतर हे पहिल्यांदाच घडलं आहे. तुम्ही हिंदूत्ववादी म्हणता. तर तुमच्या राज्यात असं कसं काय घडू शकतं? असा सवालही त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

दिल्ली पोलिसांनी कारवाई केली, तुम्ही करणार का?

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. फक्त भाजप द्वेषाची गरळ ओकणारी सभा की जनतेच्या प्रश्नांची उत्तर देणार काय? उमर खालिद, शरजील उस्मानी आणि आता अकबरूद्दीन ओवैसी यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? उमर खालिदची दखल दिल्ली पोलिसांनी घेतली. अकबरूद्दीन ओवैसीवर तात्काळ गुन्हा दाखल करणार का?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार का?

उद्याच्या सभेत तुम्ही पक्षप्रमुख म्हणून बोलणार की मुख्यमंत्री म्हणून बोलणार? आणि मुख्यमंत्री म्हणून बोलणार असाल तर मुंबई मेट्रोच काय झालं? अजान स्पर्धा, टिपू सेना, उर्दू विशेष वर्ग हे सगळ हिंदुत्वाच्या व्याख्येत बसत का? गेल्या अडीच वर्षात सामान्य नागरिकांसाठी काय केल हे ही सभेत सांगावं. उद्याच्या सभेनंतर तरी आठवड्यात चार वेळा मंत्रालयात मुख्यमंत्री जाणार का?, असे सवालही भातखळकर यांनी केले.

शिवसेनेच्या हुंकार सभेला भाजपचे 5 सवाल

>> भाजपच हिंदुत्व मनसेच हिंदूत्व यावर तुम्ही बोलू नका

>> हिंदुहदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच हिंदूत्व तरी तुम्ही पाळा

>> मुख्यमंत्री हे दाऊदच्या बाजूनेच बोलणार का?

>> नवहिंदुत्ववादी उद्धव ठाकरे हे नवाब मलिकांचीच बाजू घेत आहेत

>> दाऊदशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्यांना मंत्र्यांना हे पाठीशी घालत आहेत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.