मोठी बातमी! प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाची परेड होत असते. दरवर्षी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते.

मोठी बातमी! प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Shivaji Park paradeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 12:40 PM

मुंबई: देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबईसह देशभरात प्रजासत्ताक दिनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. शिवाजी पार्क मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी 26 जानेवारीला मोठी परेड होत असते. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. यावर्षी मात्र गुप्तचर यंत्रणेला शिवाजी पार्क मैदानावर हवाई हल्ल्याचा कट असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच या परिसरात कसून चौकशी केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

आज सकाळपासूनच परेडची तयारी शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच खबरदारी म्हणून शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शिवाजी पार्क मैदानाची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय उद्या शिवाजी पार्कवर येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाची परेड होत असते. दरवर्षी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. यावेळी मुंबईच्या महापौरांसह पालकमंत्री आणि इतर मंत्री तसेच आमदारही उपस्थित असतात. त्यानिमित्ताने दरवर्षी पोलिसांच्या कवायतीही होत असतात. मात्र, यंदा शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

शिवाजी पार्कात उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेली शिवाजी पार्कात 17 चित्ररथाचे पथसंचलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या खात्यांची माहिती पटवून देणारे हे सर्व चित्ररथ आहेत.

यात नगरविकास विभाग, सांस्कृतिक विभाग, गृहनिर्माण विभाग, पर्यावरण विभाग आदी वेगवेगळ्या खात्याची माहिती ही सर्वसामान्य लोकांना व्हावी याकरता या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी पार्क मैदानात उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची पूर्वतयारी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.