Biparjoy Updates : ‘बिपरजॉय’चा धोका वाढला, ६७ रेल्वे रद्द
Cyclone Biparjoy in mumbai : बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम देशात दिसणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई अन् कोकण किनारपट्टीवर वादळाचे परिणाम दिसणार आहे.
मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका देशाला बसण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळला आहे. आता हे वादळ गुजरातच्या दिशेने वेगाने जात आहे. या चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. IMD च्या ताज्या अपडेटनुसार, चक्रीवादळ 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळील सौराष्ट्र आणि कच्छ पार करणार आहे. त्यानंतर ते कराचीला जाणार आहे. दरम्यान, वादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीच्या उपयायोजना केल्या आहेत. तसेच ६७ रेल्वे गाड्याही रद्द केल्या आहेत.
६७ रेल्वे गाड्या रद्द
बिपरजॉय चक्रीवादळामुळे रेल्वेने ६७ गाड्या रद्द केल्या आहेत. १५ जूनपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. चक्रीवादळामुळे 15 आणि 16 जून रोजी गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सध्या कुठे आहे वादळ
बिपरजॉय चक्रीवादळ ईशान्य आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर पोरबंदरच्या नैऋत्येस आहे. हे वादळ जाखाऊ बंदराच्या दक्षिण-नैऋत्येस 360 किमी अंतरावर आहे. 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ ओलांडून ते कराचीत जाणार आहे.
#WATCH | Gujarat | Rough sea conditions and strong winds witnessed in Dwarka, as an effect of #BiparjoyCyclone. Visuals from Gomtighat in Dwarka.
As per IMD's latest update, VSCS (very severe cyclonic storm) Biparjoy lay centred at 02:30 IST over the Northeast and adjoining east… pic.twitter.com/oesjASr8R0
— ANI (@ANI) June 13, 2023
प्रशासन अलर्ट मोडवर
बिपरजॉय चक्रीवादळामुळे प्रशासनकडून आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. गुजरातमध्ये भावनगर, राजकोट, अहमदाबाद आणि गांधीधाममध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत. अतिरिक्त हेल्पलाइन क्रमांक देखील सक्रिय केले आहेत.
मोदी यांनी घेतली माहिती
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी बिपरजॉय चक्रीवादळासंदर्भातील पूर्वतयारीची माहिती घेतली. आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन केंद्र सरकारने दिलं आहे. गुजरात राज्याला चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
बिपरजॉय काय आहे?
अरब महासागरात ६ जून रोजी चक्रीवादळ आले. या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव देण्यात आले. बिपरजॉय हा शब्द बंगाली आहे. त्याचा अर्थ संकट होते. बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले. बिपरजॉयमुळे यंदा मान्सूनला उशीर झाला. नेहमी केरळमध्ये १ जून रोजी येणार मान्सून ८ जून रोजी आला. त्यानंतर राज्यात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला असला तरी अजून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला नाही.
हे ही वाचा
Cyclone Biparjoy : ‘बिपरजॉय’ नाव कसे पडले? कोणी दिले चक्रीवादळाला नाव