AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ; हॉटेलमधील जेवनही महागणार

महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यवसायीकांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी वाढल्या आहेत. मुंबईमध्ये गॅस सिलिंडरचे भाव 2050 रुपयांवर पोहोचले आहेत.

व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ; हॉटेलमधील जेवनही महागणार
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 1:05 PM
Share

मुंबई :  महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यवसायीकांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी वाढल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टिने दिलासादायक गोष्ट म्हणजे, घरगुती सिलिडंरचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र व्यवसायिक सिलिंडर 100 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान सिलिंडरचे दर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हॉटेलचे जेवन महागणार

सिलिंडरच्या नव्या दरानुसार आता मुंबईत 19 किलो व्यवसायिक सिलिंडरची किंमत 2050 रुपये झाली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास 250 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. आज पुन्हा एकदा सिलिंडर 100 रुपयांनी महागले आहे. व्यवसायिक सिलिंडर महागल्याने हॉटेलमधील जेवनाचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. जेवनाच्या प्रत्येक डिलिव्हरीमागे ग्राहकांना 15 ते 20 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार  आहेत.

दिलासा नाहीच 

दरम्यान पुढील काळात पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर कमी होतील असा अंदाज वर्तवला जात होता. ज्याप्रमाणे केंद्राने पेट्रोल, आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून, सर्वसामान्यांना दिलासा दिला. तसाच काहीसा निर्णय गॅस सिलिंडरबाबत देखील होऊ शकतो, अशी अपेक्षा होती. मात्र याउलट गॅस सिलिंडरचे दर आज पुन्हा एकदा शंभर रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका हा व्यवसायिकांना बसणार असून, यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार ओटीपी, एसबीआयचा नवा नियम

दिलासादायक! शेअरबाजारातील पडझडीला ब्रेक; सेन्सेक्स 700 अंकांनी उसळला

ज्या भारतीय सीईओंचा जगभर डंका; ते अग्रवाल, नाडेला, पिचाई नेमके कमवतात किती?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.