Sachin Vaze Arrested Updates : NIA मोठी कारवाई करणार, सचिन वाझे यांच्यानंतर आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता

| Updated on: Mar 14, 2021 | 10:03 PM

तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना NIA कडून अटक करण्यात आली. (Sachin Vaze Arrested Updates)

Sachin Vaze Arrested Updates : NIA मोठी कारवाई करणार, सचिन वाझे यांच्यानंतर आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता
सचिन वाझे

मुंबई : मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Mar 2021 06:10 PM (IST)

    NIA मोठी कारवाई करणार, सचिन वाझे यांच्यानंतर आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता

    सचिन वाझे यांच्यानंतर NIA आणखी काही अधिकाऱ्यांना अटक करण्याची शक्यता, NIA ने कोर्टातदेखील आणखी काही अधिकारी या प्रकरणात सामील असल्याचा दावा केलाय, त्यामुळे NIA लवकरच आणखी काही अधिकाऱ्यांना अटक करण्याची शक्यता

  • 14 Mar 2021 04:33 PM (IST)

    सचिन वाझे यांचं निलंबन, सूत्रांची माहिती

    सचिन वाझे यांचं निलबंन झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय, कोणताही अधिकारी 48 तासांपेक्षा जास्त वेळ पोलीस कोठडीत असेल तर त्याचं निलंबन होतं. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. पण याबाबत पोलीस दलाकडून अद्याप औपचारीकपणे माहिती जारी करण्यात आलेली नाही.

  • 14 Mar 2021 04:26 PM (IST)

    सचिन वाझे यांना कोर्टाहून NIA कार्यालयात आणलं, पुढचे अकरा दिवस चौकशी होणार

    सचिन वाझे यांना कोर्टाहून NIA कार्यालयात आणण्यात आलं, वाझे यांची NIA कार्यालयात पुढचे 11 दिवस चौकशी होणार, दरम्यान पुढच्या 24 तासात त्यांचं निलंबन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर त्यांचे सहकारी रियाज काझी यांची गेल्या साडेचार तासांपासून NIA कडून चौकशी सुरु आहे

  • 14 Mar 2021 04:13 PM (IST)

    सचिन वाझे यांनी गुन्ह्याची कबुली दिली, NIA च्या वकिलांचा कोर्टात दावा

    सचिन वाझे यांनी गुन्ह्याची कबुली दिली, NIA च्या वकिलांनी कोर्टात दावा केला, पण सचिन वाझे यांच्या वकिलांनी तो दावा फेटाळला

  • 14 Mar 2021 04:11 PM (IST)

    ‘केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात राजकारण व्हावं, पण यंत्रणेला गोवलं जाऊ नये, त्याने पोलिसांचं खच्चिकरण’

    ज्येष्ठ वकील अॅड. असीम सरोदे यांनी सचिन वाझे यांच्या कोठडीवर प्रतिक्रिया दिली. “चौकशी कशी करायची, याची जाणीव राष्ट्रीय तपास यंत्रणेला आहे. त्याबाबत नियमावली आहे. संबंधित व्यक्तीसोबत अमानुष वागणूक करता येत नाही. कोणतीही जबरदस्ती न करता चौकशी करण्याचे अधिकार आहेत. पुढच्या काही दिवसात आणखी काही जणांना अटक होईल, असं वाटतंय. पण तंस झाल्यास पोलिसांचं मनोबल खच्चिकरण होईल. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेद असावेत. त्यांच्यात राजकीय संघर्ष जरुर व्हावा. कारण राजकारणाचा तो भाग आहे. पण कोणत्याही यंत्रणेला त्यात गोवणं आणि नंतर अराजकीय करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कोणत्याही पक्षाची सत्ता असो त्यांनी कायदा मोडतोड करुन वापरणं हे जास्त आक्षेपार्ह आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

  • 14 Mar 2021 03:49 PM (IST)

    सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी

    सचिन वाझे यांना  NIA च्या विशेष कोर्टाने 25 मार्चपर्यंत NIA कोठडी मान्य केली आहे, विशेष म्हणजे एनआयएने 14 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने दहा दिवसांची कोठडी मान्य केलीय

  • 14 Mar 2021 03:37 PM (IST)

    पोलिसातील लोकंच असं वागतील तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी? फडणवीसांचा सवाल

    सचिन वाझे प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. “हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ज्यावेळी माझ्याकडे या प्रकरणाचे पुरावे आले त्यावेळी मी स्वत: अधिवेशनात मुद्दे मांडले. पोलिसातील लोकंच अशा प्रकारे काम करणार असतील, अशाप्रकारच्या गंबीर गुन्ह्यामध्ये सहभागी होणार असतील तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी?”, असा फडणवीस यांनी केला.

    “म्हणून मी हा विषय सातत्याने मांडत होतो. पण सरकारच्या वतीने दुर्देवाने फक्त पाठीशी घालण्याचं काम सुरु होतं. एनआयएच्या कारवाईत अनेक पुरावे मिळाले आहेत. यातला अजून एकच भाग बाहेर आला आहे. मनसूख हिरेन यांच्या हत्येचाही खुलासा व्हायचा बाकी आहे. याबाबतही लवकर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे. हे केवळ सचिन वाझेंपर्यंत मर्यादित नाही. यामध्ये कोण कोण आहे हे समोर यायला हवं. सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते. मी सत्तेत असताना शिवसेनेने त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, असं सांगितलं होतं. मात्र, हे सरकार आल्यानंतर कोरोनाचं नाव सांगून सचिन वाझे यांना घेतलं गेलं. मुंबईतील प्रत्येक केस त्यांच्याकडेच जाईल अशाप्रकारची व्यवस्था होती. पण सरकारच्या या विश्वासामुळे आपण काहीही करु शकतो, असा अॅटीट्यूड वाझेंचा होता”, अशी टीका फडणवीस यांनी केली.

    “ज्यांनी घटना घडवली तेच पोलीस अधिकारी असतील तर कारवाई काय करणार? इतकं भयानक कुणी वागत असेल तर मुंबईल पोलिसांची इमेजचं काय होतं ते टीका करणाऱ्यांनी सांगितलं पाहिजे. माझं विरोधी पक्षनेता म्हणून काम आहे. संजय राऊत यांनी यंत्रणेला प्रश्न विचारला पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.

    “अशा प्रकारची माहिती मला घेऊन मांडण्याची आवश्यकता का पडली, हे संजय राऊत यांनी मांडलं पाहिजे. संजय राऊतांनी आधी यंत्रणेला विचारला पाहिजे. राऊतांकडून कौतुक – ते माझं काम, मला अनुभव आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर त्या योग्य ठिकाणी मांडण्याचं काम मी केलं. राज्य अस्थिर करण्याचा आरोप हास्यास्पद, एक पोलीसच अशा गंभीर गुन्ह्यात असेल आणि त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम सरकार करत असेल तर हे किती योग्य? सचिन वाझेंना का घेण्यात आलं? त्यांना एवढं मोठं पद का देण्यात आलं?”, असे सवाल फडणवीस यांनी केले.

  • 14 Mar 2021 03:25 PM (IST)

    वाझे प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु, NIA कडून 14 दिवसांच्या कोठडीची मागणी

    वाझे प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु, न्यायमूर्ती शिंक्रे यांच्यासमोर सुनावणी सुरु करण्यात आली आहे, कोर्टात एनआयएकडून 14 दिवसांच्या रिमांडची मागणी, तर अॅड. सुनील गोन्सावलीस यांच्याकडून युक्तीवाद सुरु

  • 14 Mar 2021 03:18 PM (IST)

    ‘सचिन वाझे यांना अडकवलं जातंय’, भाऊ सुधर्म वाझे यांची प्रतिक्रिया

    सचिन वाझे यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “सचिन वाझे तपासाला नक्कीच सहकार्य करतील. मी टीव्हीवरव बघतो तेवढीच माहिती आमच्याकडे आहे. सचिन यांची जी भावना आहे ती त्यांनी व्हाट्सअॅप स्टेटसवर व्यक्त केली होती. तशीच भावना आमच्याशी व्यक्त केली होती. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांनी सविस्तर सांगितलं नाही. पण त्यांना अडकवण्याची भीती होती. सचिन वाझे यांनी स्वत: तशी भीती व्यक्त केली आहे. ते सक्षम अधिकारी आहेत. ते प्रत्येक गोष्टीला सहकार्य करतील. जेवढं मीडियातून बघतायो त्यावर प्रतिक्रिया देतोय”, असं सुधर्म वाझे म्हणाले.

  • 14 Mar 2021 02:42 PM (IST)

    सचिन वाझे एनआयएच्या विशेष कोर्टात हजर

    सचिन वाझे एनआयएच्या विशेष कोर्टात हजर, जामीन मिळणार की कोठडी? थोड्याच वेळात निर्णय होण्याची शक्यता, मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना NIA कडून अटक

  • 14 Mar 2021 02:30 PM (IST)

    NIA सचिन वाझेंना घेऊन कोर्टाच्या दिशेने रवाना

    NIA सचिन वाझेंना घेऊन कोर्टाच्या दिशेने रवाना, थोड्याच वेळात कोर्टात हजर केले जाणार

  • 14 Mar 2021 02:15 PM (IST)

    रियाझ काझी यांची NIA तीन तासापासून चौकशी

    एपीआय रियाझ काझी यांची NIA तीन तासापासून चौकशी, रियाझ काझी हे सचिन वाझेंचे सहकारी,

  • 14 Mar 2021 02:06 PM (IST)

    हे सरकार सचिन वाझेला पाठीशी घालतयं, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : गोपीचंद पडळकर 

    गोपीचंद पडळकर

    – सचिन वाझेला नुसतं अटक करून चालणार नाही,

    – आता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,

    – राम कदम यांच्या मागणीचे मी समर्थन करतो, सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा,

    – हे सरकार सचिन वाझेला पाठीशी घालत होते,

    – आता या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे

  • 14 Mar 2021 02:02 PM (IST)

    राज्यात राष्ट्रपती राजवट लागावी : नारायण राणे

    नारायण राणेची सचिन वाझेंच्या प्रकरणावर प्रतिक्रिया

    -दिशा सालियन प्रकरणापासून सुशांत ते मनसुख पर्यंत एनआयएने चौकशी करावी -दिशा सालियन प्रकरणात कुणाला तरी वाचवण्यासाठी वाझेंना आणण्यात आलं -वाझेंची पोस्टिंग कोणी केली -दिशा सालियन प्रकरण कोणी वाझेंना दिली ही सर्व माहिती बाहेर आली पाहिजे -कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत आहे

    -पोलिसांचा वापर वैक्तिक कारणासाठी -केंद्राला अमित शहाला पत्रं पाठवलं, कायदा सुव्यवस्थेची महािती दिली -जनता सुरक्षित नाही, या सर्व प्रकरणाची चौकशी करावी -राज्यात तीन दिवस आधी दिल्लीत असतानाच -राज्यात राष्ट्रपती राजवट लागावी याची माहिती

    -रवी पुजारी त्याला कोण वापर होतं त्याची चौकशी व्हावी -वाझेंना सेनेचा आश्रय म्हणून बेकायदेशीर काम सुरू आहे -वाझेंच्या जीवावर सेना धमक्या देते नाही तर संपवून टाकू – शिवसेना नेत्यांशी वाझेंचे संबंध

  • 14 Mar 2021 12:46 PM (IST)

    क्राईम ब्रांचचे अधिकारी इनोव्हा वापरायचे, सूत्रांची माहिती

    क्राईम ब्रांचचे अधिकारी इनोव्हा वापरायचे, टीव्ही 9 ला सूत्रांची माहिती, क्राईम ब्रांचच्या काही अधिकारी ती इनोव्हा वापरत होते. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • 14 Mar 2021 12:29 PM (IST)

    वाझेंच्या नेतृत्वातील पथकाचा भाग असलेले पोलीस NIA कार्यालयात

    मुंबईः मुंबई पोलिस सीआययूचे (क्राइम इंटेलिजेंस युनिट) अन्य 4 सदस्य NIAच्या कार्यालयात पोहोचले. अटक केलेल्या मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या नेतृत्वात असलेल्या पथकाचा ते भाग आहेत.

  • 14 Mar 2021 11:58 AM (IST)

    खरे मारेकरी अजून मोकाट, मनसुख हिरेन यांच्या निकटवर्तीयाची प्रतिक्रिया

    मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांशी मी बोलणे केले असता त्यांनी या प्रकरणी सध्या तरी माध्यमांशी बोलू नका असे तपास अधिकाऱ्यांनी संगितले आहे. हिरेन कुटुंबिय अजून देखील मोठ्या दुःखात आहे. सचिन वाझे यांना nia ने अटक केली आहे मात्र खरे मारेकरी अजून मोकाट आहे. अजून काही लोकांना ताब्यात घेतले आहे. पण आशाप्रकारे घातपात आणि समाजात धार्मिक सलोखा बिघडण्याची कामे या अगोदरच्या प्रकरणात मध्ये योग्य तो तपास लावावा असे सामाजिक कार्यकर्ते आणि मनसुख हिरेन यांचे निकटवर्तीय संदीप खांबे यांनी सांगितले आहे.

    बाईट: संदीप खांबे – सामाजिक कार्यकर्ते आणि मनसुख हिरेन यांचे निकट वर्तीय.

  • 14 Mar 2021 11:24 AM (IST)

    सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

    सचिन वाझे प्रकरण – तो स्थानिक विषय आहे. मी जास्त भाष्य करणार नाही. 5 राज्यांच्या निवडणुका जो ट्रेंड आहे तो देशाला दिशा देणारा आहे.  शेतकऱ्यांसदर्भात राज्य सरकार हिताचा निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे, सचिन वाझे प्रकरणी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

  • 14 Mar 2021 11:12 AM (IST)

    केंद्र आणि राज्य सरकार योग्य ती कारवाई करणार : अनिल देशमुख

    तपासात जे काही पुढे येईल त्याबाबत योग्य ती कारवाई राज्य आणि केंद्र सरकार करणार, एनआयए आणि एटीएस कारवाई करत आहे : अनिल देशमुख

  • 14 Mar 2021 11:11 AM (IST)

    मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहिती : संजय राऊत

    मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहिती आहे, ATS स्फोट प्रकरण व्यवस्थित हातळलं आहे. राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु, केंद्राकडून दबाव दाखवण्याचा प्रयत्न : संजय राऊत

  • 14 Mar 2021 11:05 AM (IST)

    मनसुख हिरेन यांच्या घराखाली ठाणे ATS टीम दाखल

    मनसुख हिरेन यांच्या घराखाली ठाणे ATS टीम दाखल

    दोन जण घराखाली चेकिंग करीत आहे

    विकास पाम या इमारती खाली ATS दाखल

    ठाण्याती घराखाली अधिकाऱ्यांकडून चेकींग

  • 14 Mar 2021 10:39 AM (IST)

    सचिन वाझेंच्या घराला टाळं; कुटुंबीयही 10-12 दिवसांपासून गायब

  • 14 Mar 2021 10:16 AM (IST)

    सचिन वाझेंच्या प्रकरणावरुन संजय राऊतांचे नवं ट्वीट

  • 14 Mar 2021 10:05 AM (IST)

    सचिन वाझेंची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा द्यावा : प्रसाद लाड

    मुंबई : सचिन वाझेंची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील ओसामा बीन लादेनला अखेर अटक करण्यात आली. नैतिक जबाबदारी मानून गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. एनआयएने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही स्वत:कडे घ्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

  • 14 Mar 2021 09:43 AM (IST)

    सचिन वाझे यांची वैद्यकीय चाचणी, जे. जे. रुग्णालयात तपासणी होणार

    मुंबई : सचिन वाझे यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले होते, जे.जे रुग्णालयात वाझेंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, 11 च्या सुमारास वाझेंना न्यायालयात सादर केले जाणार

  • 14 Mar 2021 08:58 AM (IST)

    अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या कटात 5 ते 7 जणांचा समावेश

    अंबानींच्या घरासमोर भरलेल्या गाडीचे प्रकरण, या कटात 5 ते 7 जणांचा समावेश असण्याची शक्यता, NIA च्या सूत्रांची माहिती, मुंबई पोलीस दलातील आणखी काही बड्या अधिकाऱ्यांची होऊ शकते चौकशी, मुंबई पोलिस आयुक्तालयात आॅन ड्युटी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर खळबळ, ठाणे येथून आणखी ३ जणांना एनआयए ताब्यात घेण्याची शक्यता,  इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायीकाला ताब्यात घेण्याची शक्यता

  • 14 Mar 2021 08:53 AM (IST)

    सचिन वाझेंच्या चौकशीवेळी NIAच्या हाती सबळ पुरावा? ठाण्यातील ‘त्या’ नेत्याची चौकशी होण्याची शक्यता

  • 14 Mar 2021 08:50 AM (IST)

    सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप

  • 14 Mar 2021 08:47 AM (IST)

    …म्हणूनच पोलीस विरोधी पक्षनेत्यांना माहिती पुरवतात; सामना ‘रोखठोक’मधून फडणवीसांवर आरोपांच्या फैरी

  • 14 Mar 2021 08:47 AM (IST)

    गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा ; सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजप आणखी आक्रमक

  • 14 Mar 2021 08:39 AM (IST)

    सचिन वाझेंवर कोणते आरोप?

    स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत

  • 14 Mar 2021 08:39 AM (IST)

    सचिन वाझे यांना अटक, 13 तासांच्या चौकशीनंतर बेड्या

    मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशीरा NIA कडून अटक करण्यात आली. जवळपास 13 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर एनआयएने सचिन वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली, असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. त्यामुळे आता पोलीस कोठडीतील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Published On - Mar 14,2021 6:12 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.