5 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत नेमकं काय घडलं?, हिरेन यांना वाझे किती वेळा भेटले; वाचा, मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब!

मनसुख हिरेन यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी एफआयआर दाखल केला आहे. (Sachin Vaze killed my husband, claims Mansukh Hiren's wife in FIR)

5 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत नेमकं काय घडलं?, हिरेन यांना वाझे किती वेळा भेटले; वाचा, मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब!
विमल हिरेन, मनसुख हिरेन यांच्या पत्नी
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 8:12 PM

मुंबई: मनसुख हिरेन यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यात एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या एफआयआरमध्ये अनेक धक्कादायक आरोप करण्यात आल्याने वाझे यांच्या भोवतीचं संशयाचं वलय वाढलं असून वाझे हे कोंडीत सापडण्याची शक्यता बळावली आहे. (Sachin Vaze killed my husband, claims Mansukh Hiren’s wife in FIR)

माझ्या पतीची हत्या करण्यात आल्याचा मला संशय आहे आणि या हत्येमागे सचिन वाझे यांचाच हात आहे. या एफआयआरमध्ये हिरेन यांच्या गायब होण्यापासूनचा सर्व घटनाक्रम देण्यात आला आहे. त्यातील काही महत्त्वाचा भाग जशाच्या तसा देत आहोत.

कबुली जबाबातील काही भाग जशाच्या तसा

”पीटर न्यूटनच्या इच्छेनुसारच माझ्या पतीकडे तीन वर्षांपासून स्कॉर्पिओ कार होती. आमचे नियमित ग्राहक सचिन वाझे माझ्या पतीला ओळखत होते. माझ्या पतीने वाझेंना ही कार नोव्हेंबर 2020मध्ये दिली होती. 5 फेब्रुवारी रोजी हार्ड स्टिअरिंगचा प्रॉब्लेम झाल्याने वाझे यांनी ही कार ड्रायव्हरसह आमच्या दुकानात पाठवून दिली. 17 फेब्रुवारी रोजी 6.30 वाजता माझे पती एकटेच या कारने मुंबईकडे रवाना झाले. स्टिअरिंग जाम झाल्याने त्यांनी ही कार मुलुंड टोल प्लाझाच्या पुढे पार्क केली. त्यानंतर ओला-उबर कॅबने ते मुंबईकडे रवाना झाले. 18 फेब्रुवारी रोजी रोजी दुकानातील एक कर्मचारी कार दुरुस्त करण्यासाठी माझ्या पतीसोबत घटनास्थळी गेला. मात्र तिथे कार सापडली नाही.

माझ्या पतीने 18 तारखेला मला याबाबत माहिती दिली आणि त्याच दिवशी त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कार चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. 25 फेब्रुवारी रोजी आम्ही अँटालिया येथे स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मिळाल्याचं टीव्हीवर पाहिले. पण ही तिच कार आहे, असं आम्हाला वाटल नाही. 25 तारखेला एटीएसचे पोलीस इन्स्पेक्टर साळवे यांनी माझ्या पतीला फोन केला आणि त्यांना आमच्या घराच्या खाली बोलावून घेतले. माझे पती आणि मुलगा त्यांना भेटायला गेले. त्यांनी मोबाईलवर त्या स्कॉर्पिओचा एक फोटो माझ्या पतीला दाखवला. माझ्या पतीने कार ओळखली. तसेच कार चोरी गेल्याची तक्रार दाखल केल्याचंही सांगितलं. तसेच एफआयआरची कॉपीही दाखवली. एटीएस विक्रोळी युनिटने सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत विचारपूस केल्यानंतर माझ्या पतीला 6.30 वाजता सोडून दिलं.

26 फेब्रुवारी रोजी माझे पती वाझे यांच्यासोबत क्राईम ब्रँचच्या कार्यालयात गेले. रात्री 10.30 वाजता वाझेंच्या सोबत परतही आले. संपूर्ण दिवस वाझेंसोबतच होतो, असं पतीने मला सांगितलं होतं. 27 तारखेलाही माझे पती वाझेंसोबत गेले आणि संपूर्ण दिवस वाझेंसोबत राहिल्यानंतर रात्री पुन्हा 10.30 वाजता घरी आले. 28 फेब्रुवारी रोजीही ते वाझेंसोबत गेले. त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. त्यांनी स्टेटमेंटची कॉपीही सोबत आणली होती. त्यावर वाझेंची सही होती.

1 मार्च रोजी माझ्या पतीला भायखळा पोलिसांचा फोन आला होता. त्यांना तिकडे चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण ते गेले नाहीत. घरी परत आले. 2 मार्च रोजी माझे पती घरी आले होते. घरी आल्यावर त्यांनी वाझेंसोबत मुंबईला गेलो होतो असं सांगितलं. वाझेंच्या सांगण्यावरून त्यांनी अॅड. गिरींच्या माध्यमातून छळवणूक होत असल्याची एक लिखित तक्रार मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवली. पोलीस आणि मीडियाकडून छळ केला जात असल्याचं या तक्रारीत म्हटलं होतं. जेव्हा पोलिसांनी तुमचा छळ केला का? असं मी त्यांना विचारलं. तेव्हा ते नाही म्हणाले होते. मात्र, जबाब नोंदवल्यानंतरही पोलिसांकडून फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, ते मला तणावात असल्याचे किंवा परेशान असल्याचं जाणवलं नाही.

3 मार्च रोजी ते दुकानात गेले होते. नेहमीप्रमाणे ते रात्री 9 वाजता घरी आले होते. वाझेंनी मला अटक करून घेण्यास सांगितलं असून दोन तीन दिवसात जामिनावर सोडणार असल्याचंही सांगितलं आहे, असं घरी आल्यावर पतीने मला सांगितलं. त्यावेळी मी त्यांना याची काही आवश्यकता नसल्याचं सांगितलं. आपण याप्रकरणात सल्ला घेऊ असंही मी त्यांना सांगितलं. पण त्यावेळी मला त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता.

4 मार्च रोजी माझ्या पतीने मला अटक होऊ शकते असं सांगितलं. त्यांनी मला एबीएसाठी चांगला वकील शोधण्यास सांगितलं. त्यानंतर ते दुकानात निघून गेले. 6 मार्च रोजी माझ्या पतीचे भाऊ विनोद हिरेन यांनी पतीच्या मृत्यूनंतर मला सांगितले की, 4 तारखेला त्यांनी एका वकिलाशी चर्चा केली होती. त्यावेळी एबीएची काहीच गरज नसल्याचं वकिलाने स्पष्ट केलं होतं. तुम्ही एबीए केल्यानंतरही कोर्ट ती स्वीकारणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. 4 मार्च रोजी माझा मुलगा पतीला साडे आठ वाजता टिफीन घेऊन गेला होता. यावेळी माझ्या फोनवर माझ्या पतीचे काही काही मिस्ड कॉल आले होते. मी त्यांना फोन केला तेव्हा मी घरीच येत असल्याचं त्यांनी सांगितलं. घरी आल्यावर तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात? असं मी त्यांना विचारलं. त्यावर रात्री जेवणासाठी मी बाहेर जात आहे, असं त्यांनी सांगितलं. तावडे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्यांनी घोडबंदरला भेटण्यास बोलावलं आहे. मी त्यांना भेटायला जात आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे मोटारसायकलची चावी दिली आणि मी रिक्षानेच जातो, असं ते म्हणाले.

जेव्हा 11 वाजले तरी ते आले नाहीत तेव्हा मी त्यांना फोन केला. तेव्हा त्यांचा फोन बंद येत होता. मी अनेकदा त्यांना फोन लावले. परंतु त्यांचा फोन लागला नाही. 5 मार्च रोजी पहाटे 1.10 वाजता मी माझ्या दिराला याबाबतची माहिती दिली. आम्ही वाझेंशी संपर्क साधला. त्यावेळी सकाळपर्यंत वाट पाहू किंवा पोलिसात तक्रार दाखल करू असं सांगितलं. 5 मार्च रोजी माझा मुलगा आणि दीर तक्रार दाखल करण्यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात गेले. 3.30 वाजता मला मुलाचा फोन आला. मुंब्रा खाडीत वडिलांचा मृतदेह मिळाल्याचं माझा मुलगा मीतने मला सांगितलं. (Sachin Vaze killed my husband, claims Mansukh Hiren’s wife in FIR)

माझ्या पतीच्या तोंडाला चोहोबाजूंनी एक दुपट्टा गुंडाळलेला होता. तसेच 5-6 रुमालही तोंडात होते, असं मला सांगण्यात आलं. माझे पती चांगले जलतरणपटू होते. ते पाण्यात बुडूच शकत नाहीत. त्यांचा फोन, सोन्याची चेन आणि वॉलेट त्यांच्या मृतदेहासोबत मिळालेलं नाही. हे सर्व पाहता माझ्या नवऱ्याचा खून झाल्याचं मला वाटतंय. माझ्या पतीची हत्या वाझेंनीच केल्याचा माझा संशय आहे.” (Sachin Vaze killed my husband, claims Mansukh Hiren’s wife in FIR)

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास ‘एनआयए’ करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

(Sachin Vaze killed my husband, claims Mansukh Hiren’s wife in FIR)

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.