Aryan Khan case : 30 लाखांचे घड्याळ चोरले, समीर वानखेडे यांच्या टीमवर गंभीर आरोप; कुणी केला आरोप?

आर्यन खान ड्रग्स प्रकरण म्हणजे कीडनॅपिंग आणि खंडणी वसूल करण्याच प्रकरण आहे. सीबीआयकडून अपेक्षा आहे की ते योग्य तपास करतील. या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागला, असं सजनानी यांनी सांगितलं.

Aryan Khan case : 30 लाखांचे घड्याळ चोरले, समीर वानखेडे यांच्या टीमवर गंभीर आरोप; कुणी केला आरोप?
sameer wankhedeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 9:51 AM

मुंबई : एनसीबीचे मुंबई झोनचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. आर्यन खानप्रकरणी 25 कोटीच्या वसूलीच्या प्रकरणी वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता नवं प्रकरण समोर आलं आहे. एका विदेशी नागरिकाने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ब्रिटीश नागरीक करण सजनानी याने हा आरोप केला आहे. छापेमारीच्यावेळी समीर वानखेडेंनी मला अटक केली. यावेळी अधिकारी आशिष रंजन यांनी माझी 30 लाखांची रोलेक्स डेटोना घड्याळ चोरली. माझ्याकडून जप्त करण्यात आलेल्या सामनातही ती घडी दिसली नाही, असं करण सजनानी यांनी म्हटलं आहे.

आरोपानंतर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एनसीबीची एक टीम आधीच त्यांच्याविरोधात महागड्या घड्याळ्यांची खरेदी आणि विक्रीची चौकशी करत आहेत. ही घड्याळ त्यांना कशी मिळाली हे ते सांगू शकले नाहीत. तर दुसरीकडे करण सजनानी यांनी त्यांची घड्याळ छापेमारीत आशिष रंजन यांनी घेतल्याचा आरोप केला आहे. या केसचे आयओ आशिष रंजनच होते.

हे सुद्धा वाचा

दोनशे किलो गांजा नव्हताच

पूर्ण एनसीबीच्या विरोधात माझी तक्रार नाही. मात्र काही अधिकाऱ्यांच्या विरोधात माझी तक्रार आहे. मीडियात लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी समीर वानखेडे आणि त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्या.आमच्या प्रकरणात 200 किलो गांजा सापडला असं म्हणत आम्हाला अटक केली. मात्र कोर्टासमोर सादर केलेल्या लॅब रिपोर्टमध्ये तो गांजा नसल्याचे सिद्ध झालं. तरीही आम्हाला जास्तीचे चार महिने तुरुंगात काढावे लागले, असं सजनानी यांनी सांगितलं.

सुशांत प्रकरणात आरोपी बनवण्याचा प्रयत्न

समीर वानखेडे यांनी मला माझ्या मूळ केसच्या व्यतिरिक्त सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये आरोपी बनायला सांगितलं होतं. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्यांना एक षडयंत्र होतं असं दाखवायचं होतं. त्यामुळे त्यांनी मलाही आरोपी बनायला सांगितलं होतं, असा आरोप सजनानीने केलाय.

चूप बसण्यास सांगितलं

शिवाय छापेमारीदरम्यान घरात असणारी माझ लाखो रुपयांच घड्याळ गायब झाल होतं. मी एनसीबी अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता गप्प बसण्याची वॉर्निंग अधिकाऱ्यांनी दिली होती, असाही आरोप त्याने केलाय. सजनानी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या ड्रग्स प्रकरणातील सहआरोपी आहेत.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.