CP Sanjay Pandey : एका ट्विटवर मुंबई पोलीसांची कडक कारवाई, सीनिअर पीआयसह सात जणांची तडकाफडकी बदली

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काल सात पोलिसांची तडकाफडकी बदली केलीय. मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यात पासपोर्ट नूतनीकरणासाठी आलेल्या व्यक्तीला कथित मारहाण केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

CP Sanjay Pandey : एका ट्विटवर मुंबई पोलीसांची कडक कारवाई, सीनिअर पीआयसह सात जणांची तडकाफडकी बदली
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 1:19 PM

मुंबई : मुंबईचे (Mumbai) पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी काल सात पोलिसांची (Police) तडकाफडकी बदली केलीय. मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यात पासपोर्ट नूतनीकरणासाठी आलेल्या व्यक्तीला कथित मारहाण केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे ट्विटद्वारे ही तक्रार करण्यात आली होती. समता नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके, पोलीस निरीक्षक रवींद्र पडवळ, पोलीस उपनरीक्षक भागवत व्यवहारे पोलीस शिपाई निलेश राजापुरे, अंजली गवळी, अशोक गाढवे आणि प्रशांत ठाकूर यांची नायगाव विभागात बदली करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी देखील संबंधित व्यक्तीवर कर्नाटकात गुन्हा दाखल असल्याचं म्हटलंय. बदलीच्या कारवाईनं पोलिसांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

ट्विटवरुन तक्रार आणि पोलिसांची बदली

संजय पांडे यांच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी आलेल्या व्यक्तीच्या मुलीनं तक्रार केली होती. कांदिवलीतील एक व्यक्ती पासपोर्ट नूतनीकरणासाठी समतानगर पोलीस ठाण्यात आली होती. पोलिसांनी कागदपत्रांची शहानिशा केली असता त्याच्यावर कर्नाटकात गंभीर गुन्हा दाखल असून ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळं पोलिसांनी अर्जावर काहीच कारवाई केली नसल्याची माहितीहोती. गेल्या एक महिन्यापासून पोलीस आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरु असल्याची माहिती होती. या वादातून पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार संबंधित व्यक्तीच्या मुलीनं संजय पांडे यांच्याकडे केली होती. यानंतर संजय पांडे यांनी पोलिसांची बदली केलीय.

बाजू ऐकून न घेता बदली

संजय पांडे यांनी संबंधित मुलीच्या तक्रारीवरुन बाजू ऐकून न घेता बदली करण्याचे आदेश दिल्याची चर्चा सुरु आहे. पोलिसांमध्ये या प्रकरणावरुन नाराजी असल्याची माहिती आहे. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मोहिते यांच्याकडे तपास करुन अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी पुढे कोणती कारवाई केली जाते हे पाहावं लागणार आहे.

संजय पांडे ट्विटरवर सक्रिय

मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संजय पांडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या संपर्कात  असतात. मुंबईकरांकडून ते विविध सूचना मागवत असतात. सोशल मीडियावरुन आलेल्या तक्रारीवरुन संजय पांडे यांनी आता सात पोलिसांची बदली केली आहे.

इतर बातम्या:

Grammy Awards 2022: भारतीय वंशाच्या फाल्गुनी शाह, रिकी केज यांनी पटकावला प्रतिष्ठित ‘ग्रॅमी’ पुरस्कार

Dilip Walse Patil : ‘धार्मिक वाद निर्माण करून रस्त्यावर उतरायचं आणि पुन्हा कायदा-सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करायचे’

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.