नव्या संसद भवनाच्या उद्धघाटनावरुन वाद पेटणार? राहुल गांधी यांच्यानंतर संजय राऊत यांनीही साधला मोदींवर निशाणा
Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर जोरदार निशाणा साधला. नव्या संसद भवनाचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यास त्यांनी विरोध दर्शवला.
मुंबई : येत्या रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा उद्घाटन करण्यात येणार आहे. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोध केला आहे. आता राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी संजय राऊत पुढे आले आहे. राष्ट्रपतींना डावलून नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. देशात लोकशाहीचा मुडदा पडला जात असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.
काय म्हणाले राऊत
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, गेल्या दोन कालखंडात राष्ट्रपतीपदावरील व्यक्तींचा वारंवार अवमान केला जात आहे. राष्ट्रपतीपदावर अशाच व्यक्तींना बसले की जे काही प्रश्न विचारणार नाही. आता संसद भवनाच्या उद्धघाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते न होणे, हा त्यांचा मोठा अवमान आहे. आता राष्ट्रपतींना निवडणुकीसाठी बाहेर काढले जाणार असल्याचे त्यांनी केले. यासंदर्भात राहुल गांधी यांना मांडलेल्या भूमिकाला आमचा पाठिंबा आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर निशाणा साधला.
मोदींच्या पराभवानंतर उमेदवार ठरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०२४ मध्ये पराभव होणार आहे. यासाठी विरोध एकत्र आले आहे. मोदींचा पराभव झाल्यानंतर विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. राज्य सरकार आणि केंद्र सरकार तपास संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला. जयंत पाटील यांना आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी काय म्हणाले होते
स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी याबाबतची माहिती दिली होती. मात्र, मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणं राहुल गांधी यांना पटलेलं नाही. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे. पंतप्रधानांच्या नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होते. त्या भूमिकेला संजय राऊत यांनीही पाठिंबा दिला आहे.
862 कोटींचा खर्च
नवं संसद भवन त्रिकोणी आकाराचं बनलेलं आहे. हे संसद भवन चार मजली इमारतीचं आहे. संसद भवनाचा संपूर्ण परिसर 64500 वर्ग मीटरचा आहे. या संसद भवनाच्या निर्मितीसाठी 862 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नव्या संसद भवनात एक संविधान हॉल आहे. त्यात लोकशाहीचा वारसा दाखवला जाणार आहे. त्याशिवाय खासदारांसाठी लाऊंज, अनेक कमिटी रूम, डायनिंग एरिआ आणि पार्किंग स्पेसही असणार आहे.
किती सदस्य बसणार?
नव्या संसद भवनात लोकसभेचे 888 आणि राज्यसभेचे 384 सदस्य बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यमान संसद भवनात 550 लोकसभा सदस्य आणि राज्यसभेत 250 सदस्य बसण्याची व्यवस्था आहे. सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा हा एक भाग आहे.