प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ कृतीने ठाकरे गट बॅकफूटवर?; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय?

चंद्रशेखर बावनकुळेंना फार गांभीर्याने घेऊ नका. ते सदगृहस्थ आहेत. त्यांना राजकीय ज्ञान नाही. त्यांना महाराष्ट्र माहीत नाही. त्यामुळे त्यांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांच्या 'त्या' कृतीने ठाकरे गट बॅकफूटवर?; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 10:05 AM

मुंबई : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंजेबाच्या कबरीवर फुले वाहिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीवर भाजप आणि शिंदे गटाकडून टीका होत आहे. आंबेडकर यांच्या या कृतीवरून आता शिंदे गट आणि भाजपने थेट ठाकरे गटाला घेरलं आहे. प्रकाश आंबेडकरांची कृती ठाकरे गटाला मंजूर आहे काय? यावर ठाकरे गटाचं म्हणणं काय आहे? ठाकरे गट हिंदुत्व बाजूला ठेवणार आहे काय? असे सवाल या निमित्ताने भाजपकडून केले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाची प्रचंड कोंडी झाल्याचं दिसून येतं.

प्रकाश आंबेडकर यांनी औरंजेबाचं दर्शन घेतलं. त्यावर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. प्रकाश आंबेडकर यांचा आणि आमचा पक्ष वेगळा आहे. त्यात गल्लत करू नका. आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर गेले हा वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न आहे. त्याच्यासी आमचं काही घेणंदेणं नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी काल दिली होती. मात्र, आज त्यांनी या मुद्द्यावर परत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

राऊत काय म्हणाले?

आंबेडकरांच्या कृतीवरून विरोधक शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय?, असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावर राऊत आपल्या खास शैलीत उत्तर देतील आणि मोठी बातमी मिळेल असं सर्वांना वाटत होतं. पण राऊत हे काहीसे बॅकफूटवर दिसले. त्याला आम्ही उत्तर देऊ, अशी मोघम प्रतिक्रिया देत राऊत यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. राऊत यांनी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने ठाकरे गट बॅकफूटवर आलाय का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

वाघ इथे आहेत

रस्त्यावर मिंधे गटाचे काही बोर्ड पाहिले. वाघ निघाले गोरेगावला, असं त्यात लिहिलं होतं. त्यांना सांगितलं पाहिजे, तुमचं मराठी चुकलंय. वाघाचं कातडं पांघरून लांडगे निघाले गोरेगावला, असं हवं होतं. वाघ इथे आहेत. त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातून शिवसैनिक पदाधिकारी आले आहेत. शिवसेनेच्या वाटचालीची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा भगवा आहेच, तो भगव्या रंगात उजळून काढण्यासाठी दिशा देऊ, असं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे तहहयात पक्षप्रमुख

निवडणुका आहेतच. पण निवडणुका घेण्याची हिंमत या लोकांनी दाखवली पाहिजे. यांची हिंमत आहे का? आमची तयारी आहे, असं एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. उद्धव ठाकरे तहहयात पक्षप्रमुख आहेत. त्यासाठी ठरावाची गरज नाही. हे शिबीर आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....