कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री?, वरळी हिट अँड रन प्रकरणावरून संजय राऊतांचा खरमरीत सवाल

अभिनेते जयवंत वाडकर हे या वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा या महिलेचे काका आहे. वाडकर यांनी माध्यमांना याप्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. मात्र मराठी इंडस्ट्रीतील कोणत्याच कलाकाराने त्यावर काहीच न बोलल्याने संजय राऊत यांनी हा सवाल केला आहे.

कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री?, वरळी हिट अँड रन प्रकरणावरून संजय राऊतांचा खरमरीत सवाल
Worli Hit and Run CaseImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 10:47 AM

मुंबईतील वरळी इथं आलिशान मोटरगाडीने 45 वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाहला विरार इथून अटक करण्यात आली. मिहीर हा शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने मिहीर शाहची आई आणि दोन मोठ्या बहिणींना मुरबाडमधील एका रिसॉर्टमधून ताब्यात घेतलंय. त्यांच्यावर मिहीरला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. मिहीर तीन दिवसांपासून फरार होता. मिहीरने वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या कावेरी नाखवा या महिलेला रविवारी सकाळी 5.25 वाजता धडक दिली. त्यानंतर सुमारे दोन किलोमीटर दूर त्यांना फरफटत नेलं. कावेरी नाखवा या अभिनेते जयवंत वाडकर यांच्या नातेवाईक आहेत. मराठी इंडस्ट्रीतील सहकलाकाराच्या नातेवाईकाचा अशा पद्धतीने मृत्यू होतो आणि संपूर्ण इंडस्ट्री मूग गिळून गप्प बसते, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. कुठे गेली मराठी इंडस्ट्री? कसला टाळकुटेपणा ही मराठी इंडस्ट्री करतेय, असा सवाल राऊतांनी केला.

काय म्हणाले संजय राऊत?

“या राज्यातलं सरकार गुन्हेगारीला पाठिशी घालणारं आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणात हेच झालंय. ज्याप्रकारे त्या निरपराध महिलेला वारंवार गाडीखाली चिरडलं गेलं, ते एखादा नशेत असलेला, पैशांची मस्ती असलेला नराधमच करू शकतो. या मुलाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुंबई पोलिसांनी केली पाहिजे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. हिट अँड रन प्रकरणात ज्या महिलेचा मृत्यू झाला, त्या मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांचे नातेवाईक आहेत. कुठे गेली मराठी इंडस्ट्री? एरव्ही आपले कमेंट्स देत असतात. त्यांनी बोललं पाहिजे. कसला टाळकुटेपणा ही मराठी इंडस्ट्री करतेय? आपल्या मराठी इंडस्ट्रीतील एका सहकाऱ्याचे नातेवाईक अशाप्रकारे रस्त्यावर चिरडले गेले आहेत आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसता. तुमच्यामध्ये कसला मराठीपणा आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

“सरकारकडून आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही हिट अँड रनची केस काही सर्वसामान्य नाही. पुण्यातील हिट अँड रनप्रकरणी जशी अगरवाल फॅमिली होती, तशी ही शाह फॅमिली आहे. मुलाच्या वडिलांचा क्रिमिनल रेकॉर्ड तपासून पहा. त्यांचा रेकॉर्ड पोलिसांकडे नसेल तर आम्ही देतो. बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही त्यांचा रेकॉर्ड तपासून पहा. आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत,” असाही आरोप राऊतांनी पत्रकार परिषदेत केला.

हे सुद्धा वाचा

“हिट अँड रन प्रकरणातील मुलगा ड्रग्जच्या नशेत होता. हे मेडिकल रेकॉर्डमध्ये येऊ नये म्हणून त्याला तीन दिवसांपर्यंत फरार केलं होतं. त्याला लपवलं होतं आणि आता नंतर त्याला अटक करण्यात आली. यावरून मुंबई पोलिसांवरही संशय निर्माण होऊ शकतो. हा अत्यंत अमानुष प्रकार आहे आणि असा आरोपी तुरुंगातून सुटला नाही पाहिजे,” असं ते म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.