VIDEO: चंद्रकांतदादा निष्पाप, स्वच्छ हृदयाचे, सरकार पडत नसल्याने नैराश्यात, पण प्रयत्न सुरू ठेवा; राऊतांचे चंद्रकांत पाटलांना चिमटे

चंद्रकांतदादा निष्पाप आहेत. स्वच्छ हृदयाचे आहेत. निर्मळ मनाचे आहेत. त्यांच्या भावना मी समजू शकतो. राज्यातील आघाडी सरकार (maharashtra government) पडत नसल्याने त्यांना नैराश्य आलं आहे. त्यामुळे ते असं बोलत असतात.

VIDEO: चंद्रकांतदादा निष्पाप, स्वच्छ हृदयाचे, सरकार पडत नसल्याने नैराश्यात, पण प्रयत्न सुरू ठेवा; राऊतांचे चंद्रकांत पाटलांना चिमटे
संजय राऊतांचा भाजपला इशारा
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 11:35 AM

मुंबई: चंद्रकांतदादा निष्पाप आहेत. स्वच्छ हृदयाचे आहेत. निर्मळ मनाचे आहेत. त्यांच्या भावना मी समजू शकतो. राज्यातील आघाडी सरकार (maharashtra government) पडत नसल्याने त्यांना नैराश्य आलं आहे. त्यामुळे ते असं बोलत असतात. त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे चिमटे शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना लगावले. चंद्रकांत पाटील यांनी काल पुन्हा एकदा येत्या 10 मार्च नंतर राज्यातील आघाडी सरकार कोसळणार असल्याचा पुनरुच्चार केला. पाच राज्यांतील निवडणुका झाल्यानंतर ठाकरे सरकारही जाईल, असं पाटील म्हणाले होते. त्यावरून राऊत यांनी पाटलांना कोपरखळी लगावतानाच त्यांना सरकार पाडण्यासाठी खोचक शब्दात शुभेच्छाही दिल्या.

चंद्रकांतदादा सरकार पाडण्याच्या तारखा देत राहतील, त्याविषयी वाईट वाटत नाही. गेल्या दोन वर्षापासूनचा त्यांच्यावरचा प्रसंग समजू शकतो. दादांविषयी मला पूर्ण सहानभूती आहे. दादा किंवा त्यांचा पक्ष असेल. ते फार निष्पाप, स्वच्छ हृदयाचे, निर्मळ मनाचे आहेत. त्यांचा प्रयत्न असतो सरकार पाडण्याचा पण सरकार पडत नाही. त्यातून नैराश्य येतं. मग पुढची तारीख देतात. 10 मार्च नंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका येतील. त्यानंतर सरकार पडेल, असं आता ते म्हणाले. या आधी पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या. त्यानंतर सरकार पडणार असं म्हणाले होते. सरकार पाडण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले पाहिजे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू आहेत. कारण त्यांच्याकडे दुसरं काही नाही. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी माझ्या त्यांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांची हत्यारे वापरावीत, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

ते स्वत: पडले, आम्ही पडणार नाही

आम्हाला पाडता पाडता ते स्वत: पडले. त्यांच्यावर काय आभाळ कोसळले. ते मला माहीत आहे. तामिळनाडूच्या निवडणुकीनंतरही सरकार पाडणार होते. तेही होऊ शकलं नाही. पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

गोव्यात खिचडी, तर यूपीत अखिलेश यादवच

आम्ही गोव्यातून आलो. आता यूपीत जाणार. आदित्य ठाकरेही यूपीत जाणार आहेत. उत्तर प्रदेशात खिचडी पकत नाही. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव पुढे आहेत. गोव्यात खिचडी आहे. पण काँग्रेस थोडं पुढे आहे. पण टक्कर आहे. गोव्यात देवेंद्र फडणवीस ठाण मांडून आहेत. पण जमिनीवरचं चित्रं वेगळं आहे. मी कुणाविषयी बोलत आहे हे फडणवीसांना माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

तेव्हा बिस्वांना साक्षात्कार झाला नाही का?

यावेळी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या विधानावरही त्यांनी भाष्य केलं. या महाशयाची संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली. तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला नाही का? तेच राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी आहेत. त्यांच्यासोबत बिस्वा यांनी आयुष्य काढलं आणि आता त्यांच्याविरोधात बोलत आहेत. हे गैर आहे. आपल्या आधीच्या नेत्यांविषयी अशा भाषेत बोलणं योग्य नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

करारा जवाब मिलेगा! शिवसेनेची मंगळवारी पत्रकार परिषद, राऊत म्हणतात, जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका!

मध्य रेल्वेप्रकरणी केंद्रीय मंत्री दानवेंना भुजबळांचे साकडे; पत्रातून काय केली मागणी?

Maharashtra News Live Update : रवी राणा कुठेच गेलेले नाहीत ते दिल्लीत आहेत, वकिलांची माहिती

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.