Sanjay Raut on Raj Thackeray: तर अयोध्या दौऱ्यासाठी राज ठाकरेंना सहकार्य केलं असतं; राऊतांनी राज यांना डिवचलं

Sanjay Raut on Raj Thackeray: उत्तर प्रदेशातील राजकारण्यांनी आणि इतरांनी शिवसेनेला नेहमीच सहकार्य केलं आहे. त्यांना आम्ही नक्कीच मदत केली असती, असा चिमटा राऊत यांनी काढला.

Sanjay Raut on Raj Thackeray: तर अयोध्या दौऱ्यासाठी राज ठाकरेंना सहकार्य केलं असतं; राऊतांनी राज यांना डिवचलं
बाळासाहेबांची दुर्मिळ फोटो पाहण्यासाठी राज ठाकरेंना संजय राऊतांचं निमंत्रणImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 10:37 AM

मुंबई: भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Sanjay Raut) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. त्यानंतर साधूसंतांनीही राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात भूमिका घेतली. इतकेच नव्हे तर भाजपचे नेते मनोज तिवारीही (manoj tiwari) राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी मगच अयोध्येत यावं असं सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे यांना अखेर आपला पहिलाच अयोध्या दौरा रद्द करावा लागला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्याने त्यांना डिवचले आहे. राज यांना अयोध्या दौऱ्यासाठी मदत लागली असती तर आम्ही नक्कीच सहकार्य केलं असतं, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे. तसेच राज यांच्यावर दौरा रद्द करण्याची नामुष्की आली असं मी म्हणणार नाही, असं सांगतानाच भाजपने मात्र असं का करावं? असा सवाल करत राज यांचा अयोध्या दौरा रद्द होण्यामागे भाजपच असल्याचं सूतोवाचही राऊत यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टोलेबाजी केली. अयोध्येत इतर पक्षाचे काही कार्यक्रम होते. त्यांनी ते रद्द केले. त्यांना काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्कीच दिलं असतं. शेवटी अयोध्या आहे. शिवसेनाला मानणारा वर्ग अयोध्येत आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण्यांनी आणि इतरांनी शिवसेनेला नेहमीच सहकार्य केलं आहे. त्यांना आम्ही नक्कीच मदत केली असती, असा चिमटा राऊत यांनी काढला.

अयोध्या, वाराणासीत आमचा मदत कक्ष

त्यांच्यावर दौरा रद्द करण्याची नामुष्की आली असा शब्द मी वापरणार नाही. काय अडचणी आहेत माहीत नाही. भाजपनं असं का करावं? पण ठिक आहे. यातून काही लोकांना शहाणपण आलं तर बरं होईल. यातून नुकसान होतं हे काही लोकांना उशिरा समजतं. काही लोक तिर्थयात्रेला जात असतात. तेव्हा यात्रेत काही अडचणी येतात. तेव्हा लोक विचारतात काही मदत करू शकता का? शिवसेनेचा मदतकक्ष आहे या संदर्भात. अयोध्या. वाराणासीत हा मदत कक्ष आहे. आम्ही धार्मिक लोकं आहोत. कुणाला काही अडचण असेल तर मदत करतो. आम्ही राजकारणाचा अभिनिवेश मागे ठेवतो, असा चिमटाही त्यांनी काढला.

आदित्य ठाकरे इस्कॉन मंदिराला भेट देणार

यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याचं स्पष्ट केलं. आदित्य ठकारे यांच्या नेतृत्वाखाली ज्यांना ज्यांना दर्शनाला यायचं ते येतील. तयारी सुरू आहे. 15 जूनला आदित्य येतील. दर्शन घेतील. इस्कॉनच्या मंदिरालाही ते भेट देतील. त्यांना इस्कॉनकडून निमंत्रण मिळालं आहे. अयोध्येतील काही प्रमुख लोकांनाही आदित्य भेटणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.