VIDEO: शेलार म्हणाले, गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिट जरी वाचले तरी… ; राऊतांनी ऐकवला मराठा साम्राज्याच मूलमंत्र!
गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे. शिवसेनेचं तिथे डिपॉझिट जरी वाटलं तरी मी संजय राऊत सांगतील तिथे चहा आणि जेवण देईल, असं ओपन चॅलेंज भाजप नेते अशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलं होतं.
मुंबई: गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे. शिवसेनेचं तिथे डिपॉझिट जरी वाटलं तरी मी संजय राऊत सांगतील तिथे चहा आणि जेवण देईल, असं ओपन चॅलेंज भाजप नेते अशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलं होतं. त्यावर राऊतांनी पलटवार केला आहे. शेलारांना मी नेहमीच चहा पाजतो, असं सांगतानाच डिपॉझिट जप्त झालं म्हणजे लढूच नये असं नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा साम्राज्याचा मूलमंत्रही शेलार यांना ऐकवला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पानिपतात दत्ताजी शिंदे पडले. घायाळ होऊन पडले. तरीही शेवटपर्यंत म्हणत होते बचेंगे तो और भी लढेंगे. आम्ही लढणारे लोकं आहोत. तुमच्या सारखे भ्रष्ट माफीया व्याभिचारींना तिकीट दिलं असती तर आम्ही कधीच जिंकलो असतो, असा हल्ला राऊत यांनी शेलारांवर चढवला.
बचेंगे तर और भी लढेंगे
मी त्यांना नेहमीच चहा पाजतो. 1989पासून भाजप गोव्यात काम करतो. भाजपचं गोव्यात सलग दोन निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालं होतं. डिपॉझिट जप्त झालं म्हणजे लढूच नये असं काही नाही. तसं निवडणूक आयोगानेही म्हटलं नाही. पक्ष वाढवण्यासाठी लढावच लागतं. डिपॉझिट जप्त झालं तरी लढतच राहू. बचेंगे तो और भी लढेंगे हा मराठा साम्राज्याचा मंत्र आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेस कोणत्या दुनियेत आहे
राऊत यांनी गोव्यात आघाडी न होऊ शकल्याने स्थानिक काँग्रेस नेत्यांवरही हल्ला चढवला. गोव्यात आघाडी व्हावी म्हणून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा केली. पण राज्यातील नेत्यांच्या आघाडीचे फायदे लक्षात येत नाहीत. आम्ही त्यांना मदत करायला तयार होतो. पण तरीही ते वेगळे लढत आहेत. तुम्ही कोणत्या दुनियेत आहात? कुठून येतो हा कॉन्फिडन्स? आम्हाला हा कॉन्फिडन्स उधार घ्यावा लागेल, असा हल्ला त्यांनी चढवला.
शेलार काय म्हणाले होते?
काल आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका केली होती. गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे. शिवसेनेचं तिथे डिपॉझिट जरी वाटलं तरी मी संजय राऊत सांगतील तिथे चहा आणि जेवण देईल, असं आव्हानच शेलार यांनी राऊत यांना दिलं आहे. यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला होता. गोव्यात 2017 ला शिवसेना लढली तेव्हा 3 जागा लढवून त्यांना 792 मतं मिळाली. सर्व तीन जागांवर डिपॉझिट जप्त झालं. आता हे गोव्यात सरकार बनवणार, सरकार बनवणाऱ्यांना मदत करणार तर उत्तर प्रदेशात शिवसेनेनं 57 जागा लढल्या. 88 हजार 752 मतं मिळाली. 11 कोटी मतदारांमध्ये 88 हजार 595 मतं मिळाली. 57 पैकी 56 जागांवर डिपॉजिट जप्त झालं. आता हे उत्तर प्रदेशात टिकैत यांना, अखिलेश यादवांना आवाहन करणार आहेत की आम्हाला सोबत घ्या, असा टोला पाटील राऊतांना लगावला होता. त्यानंतर आता शेलार यांनी राऊतांना डिपॉझिटवरुन थेट ओपन चॅलेंज दिलं होतं.
संबंधित बातम्या:
Mumbai Fire : भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग, तिघांचा मृत्यू, 15 जखमी