अमित शाह यांच्या भाषणाची संजय राऊत यांनी उडवली खिल्ली; ट्विट करत खोचक शब्दात म्हणाले, ये डर…

नांदेड येथे काल भाजपचा महासंपर्क मेळावा पार पडला. या मेळाव्याद्वारे भाजपने लोकसभा निवडणूक प्रचाराचं बिगूल फुंकलं आहे. या महामेळाव्याला भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.

अमित शाह यांच्या भाषणाची संजय राऊत यांनी उडवली खिल्ली; ट्विट करत खोचक शब्दात म्हणाले, ये डर...
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 10:12 AM

मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नांदेड येथील भाजपच्या महामेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना चार प्रश्न विचारून त्याची उत्तरे देण्याचं आव्हानच दिलं आहे. शाह यांनी कालच्या भाषणातून सर्वाधिक टीका उद्धव ठाकरे यांच्यावरच केली. शाह यांच्या या भाषणाची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है, असं म्हणत राऊत यांनी शाह यांना डिवचले आहे. तर शाह यांचं भाषण मजेशीर आहे, असं सांगत राऊत यांनी त्यांच्या भाषणाची खिल्लीही उडवली आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांनी ट्विट करून अमित शाह यांच्या भाषणाची खिल्ली उडवतानाच भाजपवर जोरदार टीका केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे. मला प्रश्न पडला आहे. हे भाजपाचे महा संपर्क अभियान होते की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे खास आयोजन. अमित भाई यांच्या भाषणातील 20 मिनिटात 7 मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्री चा धसका कायम, असं म्हणत संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.

त्यावर भाजपनेच चिंतन करावं

शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिला. तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है. जे प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने चिंतन करायला हवे. पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय, असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे.

अमित शाह काय म्हणाले?

कालपासून भाजपचा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने नांदेडमध्ये महासंपर्क मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला अमित शाह उपस्थित होते. यावेळी शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या भाषणातून शाह यांनी उद्धव ठाकरे यांना चार प्रश्नही विचारले. उद्धवजी, सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात. दोन बोटीत पाय ठेवता येत नाही, असं सांगतानाच तिहेरी तलाक, राम मंदिर, यूसीसी आणि मुस्लिम आरक्षणावर तुमचे धोरण जनतेसमोर स्पष्ट करा, तुमची गुपिते आपोआप उघड होतील, असं आव्हानच अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं.

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.