अर्णव गोस्वामींचं कोर्ट मार्शल करणार का?, गृहमंत्र्यांनी भाष्य करावं; संजय राऊतांचं आवाहन

अर्णव गोस्वामी यांचे चॅट बाहेर आले आहेत. त्यातून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचं आधीच माहीत असल्याचं दिसून येतं. (sanjay raut slams bjp over Arnab Goswami 'WhatsApp chats)

अर्णव गोस्वामींचं कोर्ट मार्शल करणार का?, गृहमंत्र्यांनी भाष्य करावं; संजय राऊतांचं आवाहन
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 10:56 AM

मुंबई: अर्णव गोस्वामी यांचे चॅट बाहेर आले आहेत. त्यातून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचं आधीच माहीत असल्याचं दिसून येतं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे त्यांचं कोर्ट मार्शल झालं पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आता याप्रकरणावर बोललं पाहिजे. याबाबत त्यांची मते काय आहेत, याविषयी आमच्या ज्ञानात भर घातली पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला. (sanjay raut slams bjp over Arnab Goswami ‘WhatsApp chats)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारामाध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन केलं. अर्णव गोस्वामी यांच्या संदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बोलायला पाहिजे. इतर वेळी भाजप नेते देशातील सर्वच पक्षांबद्दल बोलत असतात. आता या प्रकरणावर त्यांनी बोललं पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. देशाच्या सुरक्षेविषयची माहिती बाहेर येत असेल तर हा राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धक्का आहे. गोस्वामी जणू काही राष्ट्रीय सल्लागार असल्याच्या थाटातच हे चॅट बाहेर आले आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी त्यावर भूमिका मांडायला हवी. भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी भूमिका मांडली तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

एखाद्या अधिकाऱ्याकडे नकाशा जरी सापडला तरी त्याचं कोर्ट मार्शल केलं जातं. नंतर त्या अधिकाऱ्याचं काय होतं ते कुणालाच माहीत नसतं. इथे तर पुलवामा आणि बालकोटवर हल्ला कधी होणार हे अर्णव यांना आधीच माहीत असल्याचं दिसतं. म्हणजेच देशाच्या सुरक्षेत कुठेतरी कमतरता आहे हे त्यातून दिसून येतं. त्यामुळे अर्णव यांचं कोर्ट मार्शल होणार का? असा आमचा सवाल आहे, असं राऊत म्हणाले. (sanjay raut slams bjp over Arnab Goswami ‘WhatsApp chats)

पवारांचं ऐकलं असतं तर…

यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार असल्याबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं. या विषयावर बोलणार नसल्याचं ते म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत. पवार हे शेतकरी नेते आहेत. हा प्रश्न पवारांकडून समजून घेतला असता तर प्रश्न चिघळला नसता असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

ही तर विजयाची सुरुवात

यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर भाष्य केलं. ही तर विजयाची सुरुवात आहे, असं ते म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे. (sanjay raut slams bjp over Arnab Goswami ‘WhatsApp chats)

पश्चिम बंगालमध्ये कुणाला हरवण्यासाठी लढत नाही

यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. आम्ही कुणाला हरवण्यासाठी किंवा कुणाला मदत करण्यासाठी पश्चिम बंगालच्या निवडणुका लढवत नाही. पश्चिम बंगालमध्ये आम्ही बऱ्याच वर्षांपासून काम करत आहोत. सध्या तिथे हिंदूत्व आणि राष्ट्रभक्तीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे ज्यांना भाजप आणि तृणमूल नकोय, त्यांच्यासाठी शिवसेना हा पर्याय होऊ शकतो. त्यामुळेच आम्ही पश्चिम बंगालमध्ये लढण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. मतांची विभागणी करण्यासाठी आम्ही पश्चिम बंगालमध्ये जात नाही. काही लोकांनी मतांची विभागणी करण्यासाठी तिथे एमआयएमची व्यवस्था केली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. लवकरच पश्चिम बंगालमध्ये जाऊन किती जागा लढवायचा याचा आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (sanjay raut slams bjp over Arnab Goswami ‘WhatsApp chats)

संबंधित बातम्या:

सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: कराड उत्तरमधील पहिला निकाल हाती, निगडी गावात बाळासाहेब पाटलांच्या पॅनलचा विजय

Satara Gram Panchayat Election Results 2021: मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; शंभूराज देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

Nanded Gram Panchayat Election Results 2021: … म्हणून ‘या’ गावात निकाल पाहायला गावकरीच उरले नाहीत

(sanjay raut slams bjp over Arnab Goswami ‘WhatsApp chats)

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.