ईडी, सीबीआय, एनसीबीसह किरीट सोमय्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा, फार पॉवरफुल्ल आहेत ते; संजय राऊतांचा हल्ला
जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणांचा आमच्याविरोधात वापर करता ना. मग ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. (sanjay raut slams bjp over jammu kashmir issue)
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणांचा आमच्याविरोधात वापर करता ना. मग ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. फार पॉवरफुल्ल लोकं आहेत हे. त्यांना पाहून अतिरेकी पळून जातील, असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआयला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप पॉवरफुल्ल लोकं आहेत. पाठवा ना. अतिरेकी पळून जातील. ते आमच्यावर ज्या प्रकारे ईडी, सीबीआयच्यामाध्यामातून हल्ला करता, या तिन्ही चारही संस्था तुम्ही बदनाम केल्या आहेत. या संस्थांचा तुम्ही राजकीय गैरवापर केला आहे. जा ना काश्मीरमध्ये पाठवा ना. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. आम्ही अतिरेक्यांची कागदपत्रे देऊ. फिरत बसतील काश्मीर, अनंतनाग, बारामुल्ला. जा म्हणा, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
चीनवरही सर्जिकल स्ट्राईक करा
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद परत निर्माण झाला. त्याला तणाव म्हणता येत नाही. मोहन भागवत यांनी ज्वलंत सत्य मांडलं. 370 कलम हटवून सुद्धा जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीत सुधारणा होऊ शकली नाही. आजही अतिरेक्यांचं तांडव हैदास सुरू आहे. कधी शिखांचं हत्याकांड होतंय, कधी कश्मीरी पंडितांना मारलं जातंय. काल दोन बिहारचे मजूर मारले जात नसेल तर याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. यावर तोडगा निघाला नाही तर नुसत्या पाकिस्तानच्या बाबतीत धमक्याची भाषा वापरून हे थांबलं जाणार नाही. सर्जिकल स्ट्राईक करू. मग चीनवरही करा. चीन लडाखमध्ये घुसलंय, तवांगमध्ये घुसलं. मग चीनवर स्ट्राईक करू सांगा. काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असं त्यांनी सांगितलं.
आधी केंद्राला भूमिका घेऊ द्या, मग बोलू
केंद्र सरकारला पाकिस्तानशी संबंध कसे प्रस्थापित करायचे याचा निर्णय घेऊ द्या मग बोलू. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे मतलाबाप्रमाणे निर्णय घेता काश्मीरची जनता रोज मरतेय हे चालणार नाही. आम्ही काय ठोस भूमिका घेणार? ठोस भूमिका सरकारने घ्यायची आहे. सरकार कुणाचं आहे? विरोधकांनी ठोस भूमिका घ्यावी असं कसं म्हणू शकता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरकार काय करत होतं?
परिस्थिती आटोक्यात आली की नाही सांगू शकत नाही. कारण परिस्थितीबातबच्या बातम्या बाहेर येऊ दिल्या नाही. तिथलं इंटरनेट बंद होतं. तिथल्या मीडियावर बंधनं होती. लोकांच्या हालचालीवर बंधनं होती. नेते कैदेत होते. त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या नाही. 370 कलम हटवून सरकारने लोकांच्या भावनाला चालना दिली. आम्हीही पाठिंबा दिला. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकार काय करत होतं? केंद्रीय गृहमंत्र्यांनी काश्मीरच्या परिस्थितीबाबत सांगितलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
क्रिकेट खेळल्याने प्रश्न सुटणार नाही
पाकिस्तानसोबत कोणताही संबंध नको अशी आमची भूमिका राहिली आहे. व्यापारिक, राजनितीक आणि सांस्कृतिक संबंध ठेवू नका ही आमची भूमिका राहिली आहे. तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन केक कापता. त्यांना मिठ्या मारत्या. आम्ही नाही करत हे. तुम्ही सांगा काय करणार आहात. जम्मू-काश्मीरमध्ये खूनखराबा होत आहे. दुबईत क्रिकेट खेळता की खेळत नाही ते सांगू नका. जम्मू काश्मीरवर बोला. क्रिकेट खेळल्याने प्रश्न सुटणार नाही.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 October 2021 https://t.co/kcLRcKFyUf #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2021
संबंधित बातम्या:
निवडणुकीसाठी मनसेचा ‘डिजिटल राजमार्ग’, राज ठाकरेंच्या विचारांना follow करण्याचं आवाहन
(sanjay raut slams bjp over jammu kashmir issue)