Sanjay Raut : विरोधकांच्या अंगात रावण संचारलाय, त्याचा अंत करा; राऊतांचा हल्लाबोल सुरूच

Sanjay Raut : संजय राऊत यांनी यावेळी बाबरीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांच्यावर टीका केली.

Sanjay Raut : विरोधकांच्या अंगात रावण संचारलाय, त्याचा अंत करा; राऊतांचा हल्लाबोल सुरूच
विरोधकांच्या अंगात रावण संचारलाय, त्याचा अंत करा; राऊतांचा हल्लाबोल सुरूच Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 11:17 AM

मुंबई: ज्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते चुकीचं बोलत आहेत. त्यांनी रामायण वाचलं पाहिजे. रावणाचाही इतिहास पाहिला पाहिजे. रावणाचा अंत अहंकारामुळे झाला. रावण हुशार आणि विद्वान योद्धा होता. तो अहंकाराने गेला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो, तर काहींना सत्ता गमावल्यातूनही वेगळा अहंकार निर्माण होतो. आता कोणत्या अहंकारातून कोण कुणाला रावण म्हणतो हे पाहिलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण (ravan) संचारला आहे. त्यांनी त्याचा अंत करावा आणि मग महाराष्ट्राच्या (maharashtra) प्रश्नावर बोलावं, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. काल भाजपची सोमय्या मैदानावर सभा झाली. यावेळी भाजप नेत्यांनी शिवसेनेला रावणाची उपमा देऊन सेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. याबाबत राऊत यांना सवाल केला असता त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

संजय राऊत यांनी यावेळी बाबरीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांच्यावर टीका केली. किती काळ तुम्ही बाबरी ढाच्यावर बोलणार आहात. चीनची घुसखोरीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी हे सर्व चाललं आहे. त्यांचे सिस्टर कन्सर्न सातत्याने बोलतात. राज्यात व देशात बेरोजगारी, महागाई वाढली, चीनला दम द्या. बाबरी पाडली त्यासंदर्भात तुमचे नेते सुंदर सिंह भंडारी यांना विचारावे शिवसेना कोठे होती. सीबीआयने केलेल्या तपासाची पानं तपासावी. केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. त्यांनी ती पानं वाचली तर शिवसेना कोठे आहे हे त्यांना कळेल. इतक्या वर्षांनी फुलबाजी उडवायला झालं काय? तो विषय संपला आहे. तरी का काढत आहे?, असा सवाल राऊत यांनी केला.

भोंग्यामागे पॉवर सिटी कोणाची?

भोंग्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भोंगे हा विषय नाही. या भोंग्यामागे पॉवर सिटी कोणाची? जे कायदे मोडणारे आहेत, यांच्या कारवाई होईल. महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाहीये. राज्यातील परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही. गृहमंत्री आहेत. लोकनियुक्त सरकार आहे. त्यामुळे काय करायचं हे त्यांना माहीत आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

हा तुमचा विषय नाही

अजान आणि भोंगे हा तुमचा विषय नाही. तो कायद्याचा विषय आहे. तुमच्याकडे काही काम नसेल तर देशातील वातावरण खराब करू नका. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी करत आहात. पण हे राजकीय हिताचं नाही. देशाच्या एकात्मतेला मारक असंच आहे. या देशात कायद्याचं राज्य असेल तर प्रत्येकाने कायद्याचं पालन केलं पाहिजे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.